Thane Traffic: ठाणेकरांसाठी महत्वाची बातमी, ठाण्यातील वाहतूक मार्गात पुढचे ३ दिवस मोठे बदल; पर्यायी मार्ग कोणते?

Thane Traffic Changes: ठाण्यामध्ये वाहतूक मार्गामध्ये मोठे बदल करण्यात आले आहेत. घोडबंदर रोडवरील वाहतूक ३ दिवसांसाठी बंद राहणार आहे. या कालावधीत पर्यायी मार्गावरून प्रवास करण्याचे आवाहन वाहतूक पोलिसांनी केले आहे.
Thane Traffic: ठाणेकरांसाठी महत्वाची बातमी, ठाण्यातील वाहतूक मार्गात पुढचे ३ दिवस मोठे बदल; पर्यायी मार्ग कोणते?
Thane Traffic ChangesSaam Tv
Published On

Summary -

  • ठाण्यातील वाहतूक मार्गात मोठे बदल करण्यात आले आहेत

  • घोडबंदर रोडवर ८ ते १० मे दरम्यान वाहतूक बदल

  • ब्रह्मांड जंक्शन पादचारी पुलावर गर्डर उभारणीचे काम हाती घेण्यात आले

  • वाहनचालकांना पर्यायी मार्गांचा वापर करण्याचे आवाहन

ठाण्यामध्ये राहणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी आहे. ठाण्यातील वाहतूक मार्गामध्ये मोठे बदल करण्यात आले आहेत. घोडबंदर रोडवर ८ ते १० मे दरम्यान वाहतुकीत बदल करण्यात आला आहे. ब्रह्मांड जंक्शन पादचारी पुलावर गर्डर उभारणीची काम करण्यात येणार आहे. या कामासाठीच हे वाहतुकीत बदल करण्यात आले असून वाहनचालकांनी पर्यायी मार्गाचा वापर करावा असे आवाहन वाहतूक पोलिसांनी केले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, ठाण्यातील ब्रह्मांड जंक्शन येथील पादचारी पुलावर गर्डर उभारणीचे काम हाती घेण्यात येणार आहे. या कामामुळे सुरक्षिततेच्या कारणास्तव घोडबंदर रोडवर ८ ते १० मे दरम्यान वाहतूक मार्गात बदल करण्यात आले आहेत. ठाणे पोलिस आयुक्तालयाच्या निर्देशानुसार वाहतूक विभागाचे पोलिस उप आयुक्तांनी कासारवडवली वाहतूक उपविभाग हद्दीत वाहतूक बदलाबाबत अधिसूचना जारी केली आहे.

Thane Traffic: ठाणेकरांसाठी महत्वाची बातमी, ठाण्यातील वाहतूक मार्गात पुढचे ३ दिवस मोठे बदल; पर्यायी मार्ग कोणते?
Thane-Borivali Travel: ठाण्यावरून बोरीवलीला फक्त १५ मिनिटांत पोहचा, दुहेरी बोगदा ठरणार गेमचेंजर; काय आहेत वैशिष्ट्ये?

घोडबंदर रोडवरील ब्रम्हांड जंक्शन येथे मुल्लाबाग बस डेपोजवळील पादचारी पुलावर आरपीएस पीआरएस जॉईंट व्हेंचर प्रा. लि. यांच्या वतीने गर्डर उभारणीचे काम करण्यात येणार आहे. हे काम ८ मे रोजी रात्री ११.५५ वाजल्यापासून सुरू होईल ते ९ मे रात्री ११.५५ वाजेपर्यंत तसेच ९ मे रात्री ११.५५ वाजल्यापासून ते १० मे रोजी सकाळी ६ वाजेपर्यंत सुरू राहणार आहे. या कालावधीत वाहतूक मार्गात मोठे बदल करण्यात आले आहेत.

Thane Traffic: ठाणेकरांसाठी महत्वाची बातमी, ठाण्यातील वाहतूक मार्गात पुढचे ३ दिवस मोठे बदल; पर्यायी मार्ग कोणते?
Thane Metro 10: घोडबंदरच्या वाहतूक कोंडीची कटकट संपणार; मेट्रोसोबतच आणखी एक प्रोजेक्ट, वाचा सरकारचा मास्टरप्लान

घोडबंदर रोडवर वाहतूक कोंडी टाळण्यासाठी आणि वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी या मार्गांवर वाहनांना प्रवेशबंदी लागू करण्यात आली आहे. जड - अवजड वाहनांनी या कालावधीत या मार्गावरून प्रवास करणे टाळावे, असे आवाहन वाहतूक पोलिसांकडून करण्यात आले आहे. दरम्यान, ही वाहतूक अधिसूचना पोलिस वाहने, अग्निशमन दल, रुग्णवाहिका, ग्रीन कॉरिडॉर, ऑक्सिजन गॅस वाहने तसेच इतर अत्यावश्यक सेवेतील वाहनांना लागू राहणार नसल्याचे वाहतूक पोलिसांनी सांगितले आहे.

Thane Traffic: ठाणेकरांसाठी महत्वाची बातमी, ठाण्यातील वाहतूक मार्गात पुढचे ३ दिवस मोठे बदल; पर्यायी मार्ग कोणते?
Thane-Borivali Road: ठाण्यावरून बोरिवलीला जा सुसाट, दीड तासांचा प्रवास फक्त १८ मिनिटांत; कसा आहे सरकारचा गेमचेंजर प्लान?

कोणते मार्ग राहणार बंद -

घोडबंदर रोडवरील ब्रह्मांड सिग्नलकडून मानपाडा-ब्रह्मांड सिग्नलमार्गे कापुरबावडीकडे जाणाऱ्या मार्गावर सर्व प्रकारच्या वाहनांना प्रवेश बंद करण्यात आली आहे. तसेच एमजी मोटर्स शोरूम, मानपाडा येथून मानपाडा ब्रिजवर जाणाऱ्या वाहनांनाही ब्रिज चढणीवर प्रवेश बंद असणार आहे.

पर्यायी मार्ग कोणते?

कापुरबावडीकडे जाणाऱ्या वाहनांनी ब्रह्मांड सिग्नलवरून डावीकडे वळून ब्रह्मांड सर्कल, आझादनगर रोड, लोढा आमारा समोरील चौक, कोलशेत-ढोकाळी रोडमार्गे कापुरबावडीकडे जावे असे आवाहन वाहतूक पोलिसांनी केले आहे. तर घोडबंदर रोडवरून येणाऱ्या वाहनांनी मानपाडा ब्रिजलगतच्या स्लिप रोडने नागोरी टी स्टॉलजवळ डावीकडे वळून टिकुजीनी वाडी सर्कलमार्गे वेरिएंट निलकंठ ग्रीन समोरील रस्त्याने मुल्लाबाग येथून जावे असे सांगण्यात आले आहे.

Thane Traffic: ठाणेकरांसाठी महत्वाची बातमी, ठाण्यातील वाहतूक मार्गात पुढचे ३ दिवस मोठे बदल; पर्यायी मार्ग कोणते?
Ghodbunder Road Thane: ठाण्यातील घोडबंदर रोड कधी सुरू होणार, सरकारने दिली नवी डेडलाईन

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com