नादाला लागू नका, मी ५ लोकांना ठार केले; संजय पाटलांची उघड धमकी? ठाकरेंच्या खासदाराच्या आरोपाने उडाली खळबळ

Sanjay Raut, Sanjay Patil latest news : शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) खासदार संजय राऊत यांनी मुंबई पोलीस आयुक्तांना पत्र लिहून खासदार संजय पाटील यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. आंदोलनकर्त्यांना धमक्या दिल्याचा आरोप करत तातडीने गुन्हा दाखल करून चौकशीची मागणी करण्यात आली आहे.
Sanjay Raut, Sanjay Patil latest news
Sanjay Raut, Sanjay Patil latest news
Published On

Sanjay Raut letter to Mumbai Police Commissioner : शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी मुंबईचे पोलीस आयुक्त देवेन भारती यांना एक अत्यंत खळबळजनक पत्र लिहिले आहे. ईशान्य मुंबईतील 'फुटीर' खासदार संजय पाटील यांनी आंदोलनकर्त्यांना जीवे मारण्याची जाहीर धमकी दिल्याचा आरोप राऊत यांनी केला आहे. संजय पाटलांवर कारवाई करण्यात यावी, अन्यथा मला कोर्टात जावं लागेल, असा सूचक इशारा संजय राऊतांनी दिला आहे.

संजय राऊत यांच्या पत्रातील दाव्यानुसार, संजय पाटील यांनी "माझ्या नादाला लागू नका, मी याआधी ५ लोकांना ठार केले आहे आणि आता आंदोलन केल्यास घरात घुसून थेट बॉम्ब टाकेन" असे वक्तव्य केले आहे. त्यामुळे संजय पाटलांवर तात्काळ गुन्हा दाखल करण्यात यावा. त्यांच्या घराची झडती घेण्यात यावी. त्यांनी बॉम्ब घरात तयार केले का? त्यांना कुणी पुरवले? याचा तपास करावा, अशी विनंती राऊतांनी पत्रातून केली.

Sanjay Raut, Sanjay Patil latest news
Maharashtra politic : ६ खासदार फुटल्यानंतर ठाकरेंना आणखी धक्का, अंबादास दानवे महायुतीच्या गोटात, राजकारणात खळबळ

खासदार संजय पाटील यांनी स्वतःच ५ जणांच्या हत्येची कबुली दिल्यामुळे त्यांच्यावर तातडीने खुनाचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणीही राऊत यांनी केली आहे. तसेच, हा राष्ट्रीय सुरक्षेचा गंभीर मुद्दा असल्याने दहशतवादविरोधी पथकाद्वारे (ATS) त्यांच्या घराची त्वरित झडती घेऊन, त्यांच्यावर थेट UAPA अंतर्गत कारवाई करण्यात यावी, अशी आग्रही मागणी राऊत यांनी पत्रात केली आहे. या आरोपामुळे महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.

Sanjay Raut, Sanjay Patil latest news
Ladki Bahin Yojana : आतापर्यंतचा सर्वात मोठा निर्णय; बोगस लाडक्या बहिणींकडून पैशांची वसुली, सरकारचा जिल्हाधिकाऱ्यांना थेट आदेश

खासदार संजय राऊत यांनी मुंबईचे पोलीस आयुक्त देवेन भारती यांना लिहिलेले पत्र जसेच्या तसे..

प्रिय श्री. देवेन भारतीजी,

जय महाराष्ट्र!

एका गंभीर बाबीकडे मी आपले लक्ष वेधत आहे.

शिवसेना (उद्धव बाळासाहेब) पक्षातून फुटलेले सहा खासदार देशभरात घृणेचा विषय ठरले आहेत. या फुटीविरुद्ध महाराष्ट्राच्या जनतेत कमालीचा संताप असून मतदारांची घोर फसवणूक झाल्यामुळे लोक ठिकठिकाणी रस्त्यावर उतरून आंदोलन करत आहेत. आंदोलन करणे, लोकप्रतिनिधीस जाब विचारणे हा नागरिकांचा घटनात्मक अधिकार आहे. पण ईशान्य मुंबईतील 'फुटीर' खासदार संजय पाटील यांनी आंदोलनकर्त्यांना जीवे मारण्याची धमकी दिली आहे. श्री. पाटील म्हणतात. "माझ्या नादाला लागू नका. माझ्याविरोधात आंदोलन करण्याआधी जिवाचा विमा काढून घ्या. मी सरळ तुम्हाला स्मशानात पाठवीन, नाहीतर हॉस्पिटलला पाठवीन.

धमकी देताना ते पुढे म्हणतात.

"मी याआधी ५ लोकांना ठार केले आहे. (ठार केलेले हे ५ लोक कोण व संजय पाटील यांनी त्यांना कधी व का ठार केले त्याचा तपास व्हावा. आरोपीने स्वतःच कबुली दिल्याने त्यांच्याविरोधात तात्काळ हत्येचा गुन्हा दाखल व्हावा.)

"माझ्याविरोधात कोणी आंदोलन केले तर त्यांच्यावर बॉम्ब टाकेन. घरात घुसून मारेन."

मा. भारतीजी, खासदाराकडून बॉम्ब टाकण्याची धमकी चिंताजनक आहे. हे बॉम्ब त्यांनी आपल्या घरात बनवले असतील तर त्यांच्या घराची त्वरित झडती घ्यावी. त्याकामी दहशतवादविरोधी पथकाची मदत घ्यावी. हे बॉम्ब त्यांना कुणा दहशतवादी टोळीकडून मिळाले असतील तर हा राष्ट्रीय सुरक्षेचा गंभीर मुद्दा मानावा लागेल व दहशतवादी, राष्ट्रविरोधी कृत्यांत सहभागी झाल्याबद्दल त्यांना लगेच UAPA खाली अटक होणे गरजेचे आहे.

त्यांची सर्व वक्तव्ये दहशतवाद, गुन्हेगारी कृत्यात सहभागी होण्याचे पुरावे आहेत. त्यांच्या विरोधात त्वरित कारवाई व्हावी, अन्यथा मला जनतेच्या सुरक्षेसाठी न्यायालयात दाद मागावी लागेल. खा. पाटील यांच्या धमकीमुळे समाजात चिंतेचे वातावरण आहे. या काळात एखाद्या राजकीय कार्यकर्त्यावर हल्ला झाला अथवा खून झाला तर त्याची सर्वस्वी जबाबदारी संजय पाटील यांच्यावर राहील, हे मी इथे खास नमूद करतो

कळावे,

संजय राऊत

Sanjay Raut, Sanjay Patil latest news
लातूर हादरले! अनैतिक संबंधामुळे वाद, तरुणाच्या तोंडावर महिलेने ओतले उकळते तेल; उपचारादरम्यान मृत्यू

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com