Dombivali : शिवसेनेस खिंडार; १२० रिक्षाचालकांचा मनसेत प्रवेश

मनसेचे प्रमुख राज ठाकरे यांच्या विचारांनी प्रेरित होऊन महाराष्ट्र नवनिर्माण वाहतुक सेनेत आल्याने आनंद झाल्याचे जिल्हाध्यक्ष प्रकाश भोईर यांनी नमूद केले.
dombivali, shivsena, mns, rickshaw driver.
dombivali, shivsena, mns, rickshaw driver.saam tv
Published On

डोंबिवली : गेल्या महिन्याभरापासून रोज काही ना काही राजकीय घडामोडी होताना दिसत आहेत. गेले काही दिवस महाराष्ट्र राजकारणात रिक्षावाला हा शब्द खूप गाजत आहे. त्यातच आता मनसेने (mns) शिवसेना (shivsena) झटका देत शिवसेनेच्या संघटनेमधील तब्बल १२० रिक्षाचालकांनी (rickshaw driver) मनसेच्या संघटनेत प्रवेश केला आहे. (mns latest marathi news)

राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (eknath shinde) यांचा रिक्षाचालक ते मुख्यमंत्रीपद असा झाला. त्यावरून शिवसेनेच्या नेत्यांनी शिंदे यांना रिक्षावाला म्हणून हिणवले. त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील सेना नेत्यांना जशास तसे उत्तर दिले.

dombivali, shivsena, mns, rickshaw driver.
'माझ्यामुळं बाळासाहेबांनी एकनाथ शिंदेंना आमदार केलं, त्याचा आज पश्चाताप हाेताेय'

दुसरीकडे डोंबिवलीत आता मनसेने शिवसेनेस झटका दिला आहे. शिवसेनेच्या संघटनेमधील तब्बल १२० रिक्षाचालकांनी मनसेच्या संघटनेत प्रवेश केला. महाराष्ट्र नवनिर्माण वाहतुक सेनेच्या माध्यमातून व मनसे पदाधिकारी प्रदीप चौधरी यांच्या प्रयत्नातून ठाकुर्ली रेल्वे स्थानक शेजारील रिक्षा थांब्याचे नुतनीकरण करण्यात आले.

dombivali, shivsena, mns, rickshaw driver.
विद्यार्थ्यास बेदम मारहाण करणारा व्हिडिओ व्हायरल; 'ताे' निष्ठूर शिक्षक अटकेत

त्याचे उद्घाटन वाहतुक सेनेचे सरचिटणीस अरिफभाई शेख यांच्या हस्ते झाले. यावेळी जिल्हाध्यक्ष प्रकाश भोईर, शहर संघटक योगेश पाटील आणि इतर पदाधिकारी उपस्थित होते. हे १२० रिक्षाचालक गेले ३० वर्ष शिवसेनेच्या माध्यमातून रिक्षा संघटनेत कार्यरत होते. आज हे सर्व मनसेचे प्रमुख राज ठाकरे यांच्या विचारांनी प्रेरित होऊन महाराष्ट्र नवनिर्माण वाहतुक सेनेत आल्याने आनंद झाल्याचे जिल्हाध्यक्ष प्रकाश भोईर यांनी नमूद केले.

Edited By : Siddharth Latkar

dombivali, shivsena, mns, rickshaw driver.
Shivsena : 'माताेश्री' बाहेर सेना पदाधिकाऱ्यास फुटला घाम; हृदयविकाराचा झटक्याने झाला मृत्यू
dombivali, shivsena, mns, rickshaw driver.
मी पुन्हा येईन ! राॅजर फेडररनं चाहत्यांना केलं खूष (व्हिडिओ पाहा)

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com