Mumbai Rain Update : मुंबईसह पुण्याला पावसानं झोडपलं; रस्त्यांना नद्यांचं स्वरुप, भर पावसात नागरिकांची धावाधाव, VIDEO

Mumbai Pune Rain News : मुंबईसह ठाणे आणि पुण्याला पावसानं झोडपलं आहे. काही तासांच्या पावसाने रस्त्यांना नदीचं स्वरुप आलं आहे. तर भर पावसात नागरिकांचीही धावाधाव सुरु झाली आहे.
मुंबईला पुण्याला पावसानं झोडपलं; रस्त्यांना नद्यांचं स्वरुप, भर पावसात नागरिकांची धावाधाव, VIDEO
Mumbai Rain UpdateSaam tv
Published On

मुंबई : मुंबई पुण्यात पावसाने जोरदार बॅटिंग सुरु केली आहे. आज बुधवारी मुंबईतील उपनगरात जोरदार पाऊस बरसला आहे. मुंबईसह ठाणे, पुण्याला देखील पावसाने झोडपलं आहे. जोरदार पावसामुळे रस्त्यांना नद्यांचं स्वरुप आलं आहे. या पावसामुळे हवेत सुखद गारवा निर्माण झाला आहे.

मुंबईतील पूर्व उपनगरातील मुलुंड, भांडुप, नाहूर, कांजूर, विक्रोळी, घाटकोपर या भागात जोरदार पाऊस बरसत आहे. जोरदार पावसाने ठाण्यातही हजेरी लावली. ठाण्यातील सर्वच भागात पावसाने हजेरी लावली आहे. हवामान विभागाने मुंबई आणि पुण्यात पाऊस बरसणार असल्याचा इशारा दिला होता. त्यानंतर या परिसरात तुफान पाऊस बरसला आहे. तुफान पावसामुळे रस्त्यावर पाणी साचल्याने त्यातूनच लोकांना घरी जाण्यासाठी मार्ग काढावा लागत आहे.

मुंबईला पुण्याला पावसानं झोडपलं; रस्त्यांना नद्यांचं स्वरुप, भर पावसात नागरिकांची धावाधाव, VIDEO
Vidarbha Heavy Rain Update: पश्चिम विदर्भात पावसाचा हाहाकार; ४ दिवसांत मृत्यूची धक्कादायक आकडेवारी आली समोर

पुण्यात सलग तिसऱ्या दिवशी पाऊस

पुण्यात सलग तिसऱ्या दिवशी मुसळधार पाऊस बरसत आहे. आज दुपारनंतर पुण्यात मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. पुण्यात सर्वदूर मुसळधार पाऊस बरसत आहे. खडकवासला, पानशेत, वरसगाव धरण क्षेत्रात पावसाला सुरुवात झाली आहे. त्यामुळे आवश्यकतेनुसार मुठा नदी पात्रात विसर्ग सोडण्यात येईल, अशी माहिती जिल्हा प्रशासनाने दिली आहे.

सद्यस्थितीत पुणे जिल्ह्यातील चारही धरणं १०० टक्के भरलेली आहेत. तर या मुसळधार पावसामुळे पुण्यातील शिवाजी रस्त्याला नदीचे स्वरुप आलं आहे. गेल्या एका तासांपासून सुरु असलेल्या पावसामुळे सखल भागात पाणी साचलं आहे.

मुंबईला पुण्याला पावसानं झोडपलं; रस्त्यांना नद्यांचं स्वरुप, भर पावसात नागरिकांची धावाधाव, VIDEO
Latur Rain News : लातूर जिल्ह्यात धडकी भरवणारा पाऊस; रस्त्यांवर कमरेइतकं पाणी, पाहा VIDEO

खडकवासला धरणाच्या सांडव्यातून विसर्ग सुरु करण्यात येणार

पुण्यातील धरणाच्या पाणी पातळीमधील झपाट्याने वाढ होत आहे. पाणलोट क्षेत्रामधील जोरदार पावसामुळे आज बुधवारी सांयकाळी ५ वाजता खडकवासला धरणाच्या सांडव्यावरून मुठा नदी पात्रामध्ये 2568 क्युसेकने विसर्ग सुरू करण्यात येणार आहे. पावसाच्या प्रमाणानुसार विसर्ग पुन्हा कमी/जास्त करण्याची शक्यता आहे, अशी माहिती प्रशासनाने दिली आहे. त्यामुळे धरणाजवळ राहणाऱ्या लोकांना सतर्क राहावे लागणार आहे.

मुंबई-पुण्यात पावसाचा इशारा

मुंबई, पुणे आणि ठाण्याला पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला होता. हवामान विभागाने तब्बल पुढील 4 दिवस संपूर्ण राज्यात अशीच स्थिती राहणार असल्याचा इशारा दिला आहे. त्यामुळे नागरिकांनी काळजी घ्यावी, असा सल्लाही विभागाकडून देण्यात आला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com