नवी दिल्ली : लव्ह बाईट ही प्रेम व्यक्त करण्याची ही पद्धत आहे. मात्र, हीच लव्ह बाईट जीवावर बेतू शकतो. लव्ह बाईट किंवा Hickey याने जीव जाऊ शकतो, या विषयावर अनेक नेटकरी सोशल मीडियावर चर्चा करत असतात. या लव्ह बाईट किंवा हिक्कीने कोणताही धोका नसल्याचं डॉक्टरांनी म्हटलं आहे. मात्र, मॅक्सिकोमध्ये २०२३ साली १७ वर्षांच्या तरुणाला त्याच्या गर्लफ्रेंडने लव्ह बाईट केल्यानंतर स्ट्रोक येऊन त्याचा मृत्यू झाला होता.
डॉक्टरांच्या माहितीनुसार, लव्ह बाईट किंवा हिक्कीने व्यक्तीच्या जीवाला कोणाताही धोका नाही. मात्र, लव्ह बाईट घेताना गळ्याला ताकदीने चावा घेतल्यास धोकादायक ठरू शकतं. गळ्याला मोठ्या ताकदीने चावा घेतल्याने जखमी होऊ शकतो. गळ्याचा भाग हा मेंदू आणि हृदयाशी जोडलेला असतो.
डॉक्टरांच्या माहितीनुसार, एखाद्याने गळ्याला ताकदीने चावा घेतल्यास नरडीला दुखापत होते. यामुळे नरडीच्या आत रक्तस्राव होतो. वैद्यकीय भाषेत Dissection असं म्हटलं जातं. म्हणजे यामुळे रक्ताच्या गुठळ्या तयार होतात. या मेंदूपर्यंत पोहोचल्यास स्ट्रोक येतो. डॉक्टरांचं म्हणणं आहे की, असा प्रकार होणे फार दुर्मिळ असतं.
एखाद्या व्यक्तीला नागीण असेल तर त्याने पार्टनरला लव्ह बाईट घेतला. तर या लव्ह बाईटमुळे पार्टनरच्या चेहऱ्यावर जखम होऊ शकते. तर काही वेळानंतर या व्यक्तीलाही देखील नागीणची लागण होऊ शकते. लव्ह बाईटची जखमी जास्त असेल, तर या जखमेचे निशाण लवकर जात नाहीत. यामुळे चेहऱ्यावर जखमेची खूण दिसून येते. रंगाने अधिक गोऱ्या असणाऱ्या व्यक्तीच्या चेहऱ्यावरील खूण लगेच दिसून येते. लव्ह बाईटमुळे स्ट्रोक देखील होऊ शकतो. या लव्ह बाईटमुळे पार्टनरचं रक्त गोठू लागतं. यामुळे व्यक्तीच्या नसांवर परिणाम होतो. तर यामुळे व्यक्तीला अर्धांगवायूलाही सामोरे जावं लागू शकतं.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.