Ghatkopar Hoarding Case: घाटकोपर होर्डिंग दुर्घटना प्रकरण, भावेश भिंडेला १० दिवसांची पोलिस कोठडी
Ghatkopar Hoarding CaseSaam Tv

Ghatkopar Hoarding Case: घाटकोपर होर्डिंग दुर्घटना प्रकरण, भावेश भिंडेला १० दिवसांची पोलिस कोठडी

Bhavesh Bhinde: घाटकोपर होर्डिंग प्रकरणातील मुख्य आरोपी भावेश भिंडेला आज किल्ला कोर्टामध्ये हजर करण्यात आले होते. कोर्टाने भावेश भिंडेला 26 मे पर्यंत पोलिस कोठडी सुनावली. पोलिसांनी १४ दिवसांची कोठडी मागितली होती.
Published on

सचिन गाड, मुंबई

घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेतील (Ghatkopar Hoarding Case) मुख्य आरोपी भावेश भिंडेला अटकेनंतर आज कोर्टामध्ये हजर करण्यात आले होते. कोर्टाने भावेश भिंडेला १० दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. गुरुवारी मुंबई गुन्हे शाखेने भावेश भिंडेच्या मुसक्या आवळल्या. भावेशला राजस्थानच्या उदयपूरमधून अटक करण्यात आली होती.

घाटकोपर होर्डिंग प्रकरणातील मुख्य आरोपी भावेश भिंडेला आज किल्ला कोर्टामध्ये हजर करण्यात आले होते. कोर्टाने भावेश भिंडेला 26 मे पर्यंत पोलिस कोठडी सुनावली. पोलिसांनी १४ दिवसांची कोठडी मागितली होती. पण कोर्टाने १० दिवसांचीच पोलिस कोठडी सुनावली आहे. घाटकोपरच्या होर्डिंग दुर्घटनेच्या तिसऱ्या दिवशी आरोपी भावेशला उदयपूरमधून मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने अटक केली. भावेश भिंडेच्या चौकशीनंतर या प्रकरणातून महत्वाची माहिती समोर येईल.

Ghatkopar Hoarding Case: घाटकोपर होर्डिंग दुर्घटना प्रकरण, भावेश भिंडेला १० दिवसांची पोलिस कोठडी
Mumbai Mega Block News : 17 मे पासून मध्य रेल्वेवर विशेष ब्लॉक, लोकल सेवेवर होणार परिणाम

सोमवारी वादळी वाऱ्यासह झालेल्या मुसळधार पावसामुळे घाटकोपरच्या इस्टर्न एक्स्प्रेस हायवे शेजारी असलेल्या पेट्रोल पंपावर भलेमोठे होर्डिंग पडले होते. या दुर्घटनेमध्ये आतापर्यंत १६ जणांचा मृत्यू झाला. तर ८० जण जखमी झाले. जखमींवर सध्या राजावाडी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. भावेश भिंडेच्या एका चुकीमुळे १६ जणांचे नाहक बळी गेले. या घटनेमध्ये संपूर्ण पेट्रोलपंप उद्ध्वस्त झाला. तसंच, अनेक वाहनांचे मोठे नुकसान झाले.

Ghatkopar Hoarding Case: घाटकोपर होर्डिंग दुर्घटना प्रकरण, भावेश भिंडेला १० दिवसांची पोलिस कोठडी
Ghatkopar Hoarding Collapsed : 'घाटकोपरचा तो अपघात नाही, तर...', होर्डिंग दुर्घटनेवरून देवेंद्र फडणवीसांचा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल

दरम्यान, बीएमसीकडून फक्त ४०X ४० फूटांचे होर्डिंग लावण्यास परवानगी आहे. असे असताना देखील घाटकोपरच्या इस्टर्न एक्स्प्रेस हायवेलगत भावेश भिंडेने १२०X १२० फुटांचे होर्डिंग लावले. हे होर्डिंग अनधिकृत होते. या घटनेनंतर मुंबई महानगर पालिकेने अनधिकृत होर्डिंगविरोधात कारवाई करण्यास सुरूवात केली आहे. बीएमसीने १०२५ मोठ्या आणि लहान होर्डिंगचे ऑडिट घेण्यास सुरूवात केली आहे.

Ghatkopar Hoarding Case: घाटकोपर होर्डिंग दुर्घटना प्रकरण, भावेश भिंडेला १० दिवसांची पोलिस कोठडी
Ghatkopar Hoarding Collapse Case: घाटकोपर दुर्घटनेप्रकरणी मोठी अपडेट! उदयपूरमधून भावेश भिंडेला अटक

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com