Ghatkopar Hoarding Collapsed : 'घाटकोपरचा तो अपघात नाही, तर...', होर्डिंग दुर्घटनेवरून देवेंद्र फडणवीसांचा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल

Maharashtra Politics 2024 : घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेवरून राजकीय वातावरण तापलं असून देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरें यांच्यावर गंभीर आरोप केले आहे. उद्धव ठाकरे यांच्या सरकारने सदर होर्डिंग उभारण्याची परवानगी दिली आहे.
Ghatkopar Hoarding Collapsed
Ghatkopar Hoarding Collapsed Saam Digital

ज्या दिवशी इथे होर्डिंग्ज पडले, त्या दिवशी म्हणालो होतो हा मालक कुठेही लपलेला असो शोधून काढू, आणि आता शोधून काढल आहे, समोर आलं आहे सर्व परवाने उध्दव ठाकरे सरकारने दिले होते. हा अपघात नाही, या लोकांचा खून तेव्हाच्या सरकारने केला होता, असा घणाघात देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर केला. हा अपघात नाही, त्यामुळे यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल होणार आहे, असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.

एकीकडे नरेंद्र मोदी आहेत, आणि दुसरीकडे २४ पक्षांची खिचडी आहे. अरे ही काय घंटा खुर्चीची निवडणूक नाहीये. मोदीजी यांचे भक्कम इंजिन आहे, त्याला वेगवेगळ्या पक्षाचे इंजिन लागलं आहे. त्यामध्ये सर्व गोरगरीब, पीडित सर्वच बसू शकतील. तिकडे कोण आहे? फक्त इंजिन आहे, मनसेचे नाही हा मनसे आपल्या सोबत आहे. त्यांच्याकडे फक्त राहुल गांधींचे इंजिन, स्टॅलिन आहे, सोनिया आहे, मात्र इंजिनमध्ये सामान्य माणसाला बसायला जागा नसते.

मला एका गोष्टीचे आश्चर्य वाटत, मोदींना हटवण्यासाठी काय काय हातखंडे लागले. राहुल गांधी यांच्यासाठी पाकिस्तानचा मंत्री ट्विट करतो की राहुल गांधी पंतप्रधानपदी शोभतात. अरविंद केजरीवाल सुटले ट्विट करतो की याचा राहुल गांधी यांना फायदा होईल. उध्दव ठाकरे यांना माहिती आहे त्यांनी हिंदुत्व सोडलं आहे , त्यांच्यासोबत हिंदू समाज येणार नाही, त्यामुळे ते एका समजा पुरते राहिले आहेत.

Ghatkopar Hoarding Collapsed
Maharashtra Politics 2024 : '२ वर्षांनंतर नरेंद्र मोदी ७५ वर्षांचे होतायेत...'; राजकीय निवृत्तीवरून डोबिंवलीतील सभेतून उद्धव ठाकरेंनी भाजपला घेरलं

कोविड काळात जग म्हणायचं, यांच्याकडे एवढे लोक आहेत, कसे जगतील , पूर्वी लस आल्या मात्र त्याला ३०-३० वर्ष लागली.जगाकडून लस घ्यायची म्हणजे ते म्हणाले असते की थांबा आधी आमचे लोक होउ द्या, मात्र मोदीजी थांबले नाही, त्यांनी फक्त जे रॉ मटेरियल लागत ते बाहेरून आणलं आणि लस भारतात बनवली.मी मॉरिसीएस ला गेलो होतो, तेव्हा तेथील राष्ट्रपती मला म्हणाले की माझे धन्यवाद मोदीजी ना द्या, मी म्हणालो का? तर ते म्हणले की मोदींनी आम्हाला लस दिली , त्यामुळे आम्ही जिवंत आहोत.एकीकडे हे महापुरुष आणि दुसरीकडे महाराष्ट्रात काय सुरू होत? माझी कुटुंब माझी जबाबदारी, असा टोलाही त्यांनी लगावला आहे.

Ghatkopar Hoarding Collapsed
Maharashtra Election 2024: उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी धमकी, शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्यांविरोधात गुन्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com