Maharashtra Election 2024: उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी धमकी, शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्यांविरोधात गुन्हा

Mumbai South Lok Sabha Constituency News: मुंबईमध्ये एका अपक्ष उमेदवाराला उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी धमकी दिल्याचे प्रकरण समोर आले आहे. याप्रकरणी शिवसेना शिंदे गटाच्या aपदाधिकाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Case Registered Against Shivsena Shinde Group Offical For Treating Lok Sabha Candidate of South Mumbai Constituency Yamini Jadhav
Case Registered Against Shivsena Shinde Group Offical For Treating Lok Sabha Candidate of South Mumbai Constituency Yamini JadhavSaam TV

सचिन गाड, मुंबई

लोकसभा निवडणुकीमध्ये (Loksabha Election 2024) आपला उमेदवार निवडून यावा यासाठी सर्वच पक्षांकडून जोरदार प्रयत्न सुरू आहेत. अनेक ठिकाणी प्रचार सभा आणि बैठकांचे आयोजन केले जात आहे. अशामध्ये मुंबईमध्ये एका अपक्ष उमेदवाराला उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी धमकी दिल्याचे प्रकरण समोर आले आहे. याप्रकरणी शिवसेना शिंदे गटाच्या (Shivsena Shinde Group) पदाधिकाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Case Registered Against Shivsena Shinde Group Offical For Treating Lok Sabha Candidate of South Mumbai Constituency Yamini Jadhav
Mumbai Rain Alert: मुंबईकरांनो सावधान! मुंबईत वादळी वाऱ्यासह पावसाचा इशारा, हवामान खात्याचा अंदाज

मिळालेल्या माहितीनुसार, मुंबई दक्षिण मतदारसंघातील (Mumbai South Constituency) अपक्ष उमेदवार प्रशांत घाडगे यांना उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी धमकी देण्यात आली. याप्रकरणी शिवसेना शिंदे गटाच्या विभागप्रमुख आणि पक्ष सचिवाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कफ परेड पोलिस ठाण्यात हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी २ ते ५ लाखांचे आमीष दिल्याचे तक्रारीमध्ये म्हटले आहे. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे.

मतांचे विभाजन टाळण्यासाठी उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी अपक्ष उमेदवार प्रशांत घाडगे यांच्यावर दबाव टाकण्यात आला असल्याची माहिती समोर आली आहे. मुंबई दक्षिण मतदारसंघातून आमदार यामिनी जाधव या शिवसेना शिंदे गटाकडून निवडणुकीच्या रिंगणात उतरल्या आहेत. याच मतदारसंघामध्ये प्रशांत घाडगे हे अपक्ष म्हणून निवडणूक लढवत आहेत. या मतदारसंघात ठाकरे गटाकडून अरविंद सावंत निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. या मतदारसंघामध्ये यामिनी जाधव विरुद्ध अरविंद सावंत यांच्यात प्रमुख लढत होणार आहे.

Case Registered Against Shivsena Shinde Group Offical For Treating Lok Sabha Candidate of South Mumbai Constituency Yamini Jadhav
Mumbai University: मुंबई विद्यापीठात विद्यार्थ्यांना मिळणार मंदिर व्यवस्थापनाचे धडे, अभ्यासक्रमात कोणते विषय असणार?

दरम्यान, दक्षिण मुंबई मतदारसंघामध्ये कुलाबा, मुंबादेवी, मलबार हिल, वरळी, भायखळा आणि शिवडी या सहा विधानसभा मतदारसंघांचा समावेश आहे. सहापैकी तीन मतदारसंघात शिवसेना, दोन मतदारसंघामध्ये भाजप आणि एका मतदार संघामध्ये काँग्रेसचे आमदार आहेत. या मतदारसंघामध्ये आपला उमेदवार निवडून यावा यासाठी ठाकरे गट आणि शिंदे गट यांनी आपली ताकद पणाला लावली आहे. या मतदारसंघात दोन्ही पक्षांसाठी ही निवडणूक प्रतिष्ठेची असणार आहे.

Case Registered Against Shivsena Shinde Group Offical For Treating Lok Sabha Candidate of South Mumbai Constituency Yamini Jadhav
Narendra Modi Dadar Sabha : मुंबईत PM नरेंद्र मोदी आणि राज ठाकरेंची एकत्र सभा; वाहतुकीत मोठे बदल, पर्यायी मार्ग

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com