Mumbai Rain Alert: मुंबईकरांनो सावधान! मुंबईत वादळी वाऱ्यासह पावसाचा इशारा, हवामान खात्याचा अंदाज

Mumbai Weather Update: मुंबईत गुरूवारी दुपारी किंवा संध्याकाळी मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता आहे. मुंबईत ताशी ३० ते ४० किमी वेगाने वारे वाहण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. भारतीय हवामान खात्याने हा अंदाज वर्तवला आहे.
Mumbai Rain News
Mumbai Rain NewsSaam TV

मुंबईत आज पुन्हा वादळी वाऱ्यासह पाऊस (Mumbai Rainfall) पडण्याचा इशारा देण्यात आला आहे. मुंबईत ताशी ३० ते ४० किमी वेगाने वारे वाहण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. वादळी वाऱ्यासह हलक्या पावसाची शक्यता आहे. त्यामुळे मुंबईकरांनी घराबाहेर पडताना काळजी घ्यावी आणि सतर्क राहावे, असे आवाहन हवामान खात्याकडून (Weather Department) करण्यात आले आहे.

मुंबईत गुरूवारी दुपारी किंवा संध्याकाळी मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता आहे. भारतीय हवामान खात्याने हा अंदाज वर्तवला आहे. आज मुंबईमध्ये सकाळपासून तापमानाचा पारा वाढला आहे. मुंबईत सध्या कमाल तापमान ३७ अंश सेल्सिअसपर्यंत आहे. जे सामान्यापेक्षा ३ अंश जास्त आहे. अशामध्ये दुपार किंवा संध्याकाळनंतर मुंबईत वादळी वारे आणि मेघगर्जनेसह पावसाची शक्यता असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.

Mumbai Rain News
Mumbai University: मुंबई विद्यापीठात विद्यार्थ्यांना मिळणार मंदिर व्यवस्थापनाचे धडे, अभ्यासक्रमात कोणते विषय असणार?

सोमवारी वादळी वाऱ्यासह आलेल्या पावासाने मुंबईमध्ये हाहाकार माजवला होता. या पावसामुळे मुंबईत मोठे नुकसान झाले होते. घाटकोपरमध्ये भलेमोठे होर्डिंग पेट्रोल पंपावर कोसळून १७ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला तर अनेक जण जखमी झाले आहेत. आज पुन्हा मुंबईत वादळी वाऱ्यासह पावसाचा इशारा देण्यात आला आहे. त्यामुळे नागरिकांनी घराबाहेर पडताना खबरदारी घ्यावी आणि काळजी घ्यावी, अशा सूचना प्रशासनाने दिल्या आहेत.

Mumbai Rain News
Pune News: पुण्यातील ट्रेनिंग सेंटरमध्ये २७ वर्षीय तरुणीचा विनयभंग; आरोपीविरोधात गुन्हा, संतापजनक घटना

दरम्यान, राज्यातील अनेक जिल्ह्यामध्ये देखील वादळी वाऱ्यासह पाऊस पडण्याचा इशारा हवामान खात्यान दिला आहे. हवामान खात्याने वर्तवलेल्या अंदाजानुसार, गुरूवारी रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, जळगाव, धुळे, सांगली, सोलापूर, सातारा, कोल्हापूर, छत्रपती संभाजीनगर, बीड, धाराशिव, जालना आणि लातूर या जिल्ह्यात तुरळक ठिकाणी विजांचा कडकडाट, ढगांचा गडगडाट आणि वादळी वाऱ्यासह पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर नाशिक, अहमदनगर या जिल्ह्यातील तुरळक ठिकाणी विजांचा कडकडाट, मेघगर्जना, गारपीट आणि वादळी वाऱ्यासह पाऊस पडण्याची शक्यता आहे.

Mumbai Rain News
Ghatkopar Hoarding Collapse: आरोपी भावेश भिंडेंच्या वार्षिक कमाईची माहिती आली समोर, पुणे महापालिकाही अलर्ट मोडवर

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com