Narendra Modi Dadar Sabha : मुंबईत PM नरेंद्र मोदी आणि राज ठाकरेंची एकत्र सभा; वाहतुकीत मोठे बदल, पर्यायी मार्ग

Narendra Modi Dadar Sabha traffic changes : मुंबईत १७ मे रोजी म्हणजे उद्या पंतप्रधान मोदी आणि राज ठाकरे यांची एकत्र जंगी सभा होणार आहे. या सभेच्या पार्श्वभूमीवर मुंबईतील वाहतुकीत मोठे बदल करण्यात आले आहेत.
मुंबईत PM नरेंद्र मोदी आणि राज ठाकरेंची एकत्र सभा; वाहतुकीत मोठे बदल, पर्यायी मार्ग
Narendra Modi Dadar Sabha Saam tv
Published On

वैदेही कानेकर, साम टीव्ही प्रतिनिधी

मुंबई : मुंबईत लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्याचा प्रचार सभा शिगेला पोहोचला आहे. मुंबईतील लोकसभा मतदारसंघावर पंतप्रधान मोदी विशेष लक्ष देताना दिसत आहे. काल पंतप्रधान मोदींचा रोड शो झाला. यावेळी मोदींना पाहण्यासाठी लोकांची एकच गर्दी पाहायला मिळाली. त्यानंतर मुंबईच्या दादरमधील शिवाजी पार्कात १७ मे रोजी म्हणजे उद्या पंतप्रधान मोदी आणि राज ठाकरे यांची एकत्र जंगी सभा होणार आहे. या सभेच्या पार्श्वभूमीवर मुंबईतील वाहतुकीत मोठे बदल करण्यात आले आहेत.

मुंबईच्या दादरमधील शिवाजी पार्क मैदानात पंतप्रधान मोदींची सभा होणार आहे. या सभेला मोठ्या प्रमाणात लोक उपस्थित राहण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर पोलिसांनी वाहतुकीत मोठे बदल केले आहेत. सभेमुळे दादरमध्ये वाहतूक कोंडी होऊ नये, यासाठी पर्यायी मार्ग तयार केले आहेत. तर काही मार्ग बंद केले आहेत.

मुंबईत PM नरेंद्र मोदी आणि राज ठाकरेंची एकत्र सभा; वाहतुकीत मोठे बदल, पर्यायी मार्ग
Mumbai Lok Sabha: ईशान्य मुंबईत भाजपला मोठा झटका; धार्मिक कार्यक्रमात मिहिर कोटेचा यांना मतदान करण्याचं आवाहन, गुन्हा दाखल

वाहने उभी करण्यास कुठे प्रतिबंध आहे?

1. स्वातंत्रवीर सावरकर मार्ग : बाबासाहेब वरळीकर चौक (सेन्च्युरी जंक्शन) ते हरी ओम जंक्शन, माहिम

2. संपूर्ण एम. बी. राऊत मार्ग, शिवाजीपार्क, दादर.

3. संपूर्ण केळूस्कर रोड दक्षिण आणि केळुस्कर रोड उत्तर, शिवाजीपार्क, दादर

4. एन. सी. केळकर मार्ग: हनुमान मंदिर सर्कल ते गडकरी जंक्शन, शिवाजीपार्क, दादर.

5. टी. एच. कटारीया मार्ग : गंगाविहार जंक्शन ते आसावरी जंक्शन, माहिम.

6. पांडुरंग नाईक मार्ग, (शिवाजीपार्क रोड नं. ५), शिवाजीपार्क, दादर,

7. दादासाहेब रेगे मार्ग, शिवाजीपार्क, दादर

8. डॉ. बाबासाहेब आंबेडकर रोड महेश्वरी सर्कल ते कोहिनूर जंक्शन, दादर (पूर्व)

9. टिळक रोड:- कोतवाल गार्डन सर्कल, दादर (पश्चिम) ते आर. ए. किडवाई रोड, माटुंगा (पूर्व) १२. खान अब्दुल 10. गफारखान रोड सी लिंक गेट ते जे. के. कपूर चौक ते बिंदू माधव ठाकरे चौक.

11. थडानी मार्ग:- पोददार हॉस्पीटल जंक्शन ते बिंदू माधव ठाकरे चौक.

12. डॉ. अॅनी बेझंट रोड पोद्दार हॉस्पिटल जंक्शन ते डॉ. नारायण हर्डीकर जंक्शन.

13. दिलीप गुप्ते मार्ग: शिवाजी पार्क गेट क्र. ४ ते शितलादेवी रोड, शिवाजीपार्क, दादर.

14. एल. जे. रोड : गडकरी जंक्शन, दादर ते शोभा हॉटेल, माहिम.

मुंबईत PM नरेंद्र मोदी आणि राज ठाकरेंची एकत्र सभा; वाहतुकीत मोठे बदल, पर्यायी मार्ग
Eknath Shinde : मोठी बातमी! मुख्यमंत्री शिंदे हेलिकॉप्टरमधून उतरताच बॅगांची झाडाझडती

पर्यायी मार्ग कोणते?

स्वातंत्रवीर सावरकर मार्ग उत्तर वाहिनी - सिध्दिविनायक मंदिर जंक्शन ते येस बँक जंक्शन

पर्यायी मार्ग - सिध्दिविनायक मंदिर जंक्शन उजवे वळण घेऊन एस. के. बोले रोड, आगार बाजार,

पोतुर्गीज चर्च, डावे वळण गोखले रोड किंवा एस. के. बोले मार्ग या रस्त्यांचा वापर करावा.

२. स्वातंत्रवीर सावरकर मार्ग दक्षिण वाहिनी येस बँक जंक्शन ते सिध्दिविनायक मंदिर जंक्शन

पर्यायी मार्ग दांडेकर चौक येथे डावे वळण घेऊन पांडूरंग नाईक मार्गे राजाबढे चौक येथे उजवे वळण घेवून एल. जे. रोड मार्गे गोखले रोड किंवा एन. सी. केळकर रोड या रस्त्यांचा वापर करावा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com