Ganesh Visarjan : मुंबईकरांनो, गणपती बाप्पाचं विसर्जन करताना 'या' गोष्टींची काळजी घ्या, महानगरपालिकेने जारी केल्या सूचना

Ganpati Visarjan 2024: गणेशोत्सवाला सुरुवात झाली आहे. गणपती बाप्पा घरोघरी विराजमान झाले आहेत. गणपती बाप्पाच्या विसर्जनासाठी मुंबई महानगरपालिकेकडून आवाहन करण्यात आले आहे.
Ganpati Visarjan 2024
Ganpati Visarjan 2024Saam Tv
Published On

आज घराघरात गणपती बाप्पाचे आगमन होणार आहे. गणपती बाप्पाचे आगमन झाल्यावर घरात खूप प्रसन्न वाटते.अनेकांकडे तर १० दिवसांचे गणपती असतात. मंडळांच्या गणपतीचे विसर्जन हे दहा दिवसांनी केले जाते. गणपती विसर्जनादरम्यान मुंबईतील समुद्रात गणेशमूर्तींचे विसर्जन केले जाते.

गणेश विसर्जनादरम्यान विशेष काळजी घ्यायची असते.मुंबईतील समुद्रात गणेशभक्ताना मत्स्यदंश करणारे मासे आढळून आले आहेत.मत्स्य विभागाने केलेल्या ट्रायल नोटिंगमध्ये मोठ्या प्रमाणात मासे आढळून आले आहेत, अशी माहिती मुंबई शहर जिल्ह्याच्या सहाय्यक आयुक्त यांनी सांगितली आहे. त्यामुळे गणेश मूर्तीचे विसर्जन करतावा काळजी घेण्यास सांगितले आहे.

महाराष्ट्र शासनाच्या मत्स्य विभागाने गिरगाव आणि दादर चौपाटीवर मत्स्यदंश करणारे मासे आहे की नाही हे चेक करण्यासाठी ट्रायल नोटिंग केली. यादरम्यान ढोमी, कोळंबी, स्टिंग रे, ब्लू जेली फीश, घोडा मासा असे मासे आढळून आले आहेत. जेली फीश आणि ब्लू जेली फीश हे मासे अपायकारक आहेत. त्यामुळे गणेशभक्तांना त्रास होऊ नये म्हणून काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Ganpati Visarjan 2024
Ganesh Puja Niyam: पुजेवेळी चुकूनही गणपतीला अर्पण करू नका 'या' गोष्टी; नाराज होऊ शकतो बाप्पा!

गणपती विसर्जनादरम्यान कोणती काळजी घ्यावी?

गणेश मूर्तींने विसर्जन हे मुंबई महानगरपालिकेच्या जीवरक्षरक आणि संबंधित यंत्रणेद्वारे करावे.

गणेश मूर्तीचे विसर्जन करताना गणेशभक्तांनी उघड्य अंगाने समुद्रात प्रवेश करु नये.

विसर्जनादरम्यान तुमच्या पायाला मत्स्यदंश होऊ नये म्हणून गमबुटांचा वापर करावा.

मुंबई महानगरपालिका आणि मुंबई पोलिसांद्वारे देण्यात आलेल्या सूचनांचे वेळोवेळी पालन करावे.

विसर्जनाच्या ठिकाणी प्रथमोपचार करण्यासाठी वैद्यकीय कक्ष असणार आहे. त्यामुळे जर काही घटना घडली तर वैद्यकीय कक्षाशी संपर्क करावा.

Ganpati Visarjan 2024
Ulhasnagar Ganpati : उल्हासनगरमधील नवसाला पावणारे प्रसिद्ध गणपती; 'या' गणेशोत्सवात एकदा नक्की भेट द्या

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com