Ulhasnagar Ganpati : उल्हासनगरमधील नवसाला पावणारे प्रसिद्ध गणपती; 'या' गणेशोत्सवात एकदा नक्की भेट द्या

Ulhasnagar Ganpati List: यंदाच्या गणेशोत्सवात तुम्ही उल्हासनगरमधील या गणपती मंडळांना भेट देऊ शकता. मित्र परिवार आणि कुटुंबियांसह तुम्ही येथे येऊ शकता.
Ulhasnagar Ganpati List
Ulhasnagar GanpatiSaam TV
Published On

उल्हासनगर हे ठाणे जिल्ह्यातील प्रसिद्ध शहर आहे. विविध वस्तू स्वस्त दरात खरेदीसाठी बरेच नागरिक येथे येतात. सध्या गणेशोत्सवाची लगबग सुरू आहे. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला उल्हासनगरमधील काही प्रसिद्ध गणपतींची माहिती सांगणार आहोत. तुम्ही उल्हासनगर किंवा त्याच्या आसपासच्या शहरात राहत असाल तर या गणपतीचे दर्शन घेऊ शकता.

UFC ग्रुपचा गणपती

उल्हासनगर फ्रेंड सर्कल संस्था (UFC) हा उल्हासनगरमधील सर्वात प्रसिद्ध गणपती आहे. उल्हासनगर ४ मध्ये बाप्पाच्या भव्य मूर्तीची स्थापना करण्यात येते. येथील नाविन्य म्हणजे येथे तुम्हाला अनोखी आणि विशेष अशी भव्य सजावट पाहायला मिळेल. कुटुंबियांसह तुम्ही येथे गणरायाचे दर्शन घेऊ शकता.

Ulhasnagar Ganpati List
Choose the Idol of Ganesha : गणपती बाप्पा आणताना 'ही' चूक करू नका; हसत्या-खेळत्या घरात येईल दु:ख

MM ग्रूपचा बाप्पा

उल्हासनगरमधील आणखी एक प्रसिद्ध बाप्पा म्हणजे मंगल मूर्ती ग्रूपचा गणराया. येथे पोहचण्यासाठी तुम्हाला उल्हासनगर ३ मध्ये यावं लागेल. उल्हासनगर स्टेशनला उतरल्यानंतर तेथून काही मिनिटे अंतरावर तुम्हाला मंगल मूर्ती ग्रूपच्या गणरायाचे दर्शन घेता येईल.

बॉक्सर गणपती

उल्हासनगर कॅम्प ३ मध्ये बॉक्सर गणपती आहे. या गणपतीची सुद्धा उल्हासनगरमध्ये मोठी चर्चा असते. येथील अनेक नागरिकांचं असं म्हणणं आहे की, बॉक्सर गणपती नवसाला पावणारा असल्याचं म्हटलं जातं.

उल्हासनगरचा श्री

उल्हासनगरमधील श्री मित्रमंडळाचा बाप्पा देखील फार प्रसिद्ध आहे. हा बाप्पा नवसाला पावतो असं म्हटलं जातं. उल्हासनगर ४ साने गुरुजी नगर येथे श्री मित्रमंडळाचा गणराया विराजमान होतो. हा गणरायाचे आगमन आणि येथील सजावट खरोखर पाहण्यासारखी असते.

Ulhasnagar Ganpati List
Ganpati Festival Special Recipe: बाप्पासाठी नैवेद्याला यंदा बनवा फ्रूट्स कोशिंबीर

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com