मंत्रिपद चाटायचंय का? भाजप मंत्र्यांचा पुन्हा एकनाथ शिंदेंवर हल्लाबोल, नेमकं काय म्हणाले?

Minister Ganesh Naik Accuses Eknath Shinde: नवी मुंबईतील विकास प्रकल्पांसाठी मागितलेले भूखंड बिल्डर आणि दलालांच्या माध्यमातून खोट्या पद्धतीने वाटप केल्याचा मंत्री गणेश नाईक यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर आरोप केला आहे.
Minister Ganesh Naik addressing media over Navi Mumbai land allocation controversy.
Minister Ganesh Naik addressing media over Navi Mumbai land allocation controversy.Saam Tv
Published On

विकास मिरगणे, साम टीव्ही

नवी मुंबई: शहरातील विकास प्रकल्पांसाठी नागरिकांसाठी मागितलेले भूखंड बिल्डर आणि दलालांच्या माध्यमातून खोटी पद्धतीने वाटप झाले असल्याचा आरोप मंत्री गणेश नाईक यांनी केला आहे.ते म्हणाले की नवी मुंबईकरांच्या सुविधेसाठी मी भूखंड मागितले होते. हॉस्पिटल, गार्डन यासाठी भूखंडाची आम्ही मागणी करतोय ते सर्व भूखंड नवी मुंबईकरांचे बिल्डरांच्या घशात घालण्याचा प्रयत्न केला गेला. मला या गोष्टीची लाज वाटते, ज्या मंत्रिमंडळामध्ये मी आहे त्या मंत्रिमंडळातील नगरविकास विभागाच्या लोकांनी अशा प्रकारचं कर्मद्रिधी केले असा गंभीर आरोप नाव न घेता त्यांनी एकनाथ शिंदे यांच्यावर केला आहे.

त्यांनी पुढे सांगितले, माझा राग शांत करायचा असेल तर सर्व भूखंड परत करा. नवी मुंबईकरांचे जे भूखंड आहे ते सर्व परत करा. मंत्र्यांनी महापालिकेच्या अधिकाऱ्यांना आणि सिडकोच्या गणेश नाईक यांच्यावरून सुनावली असल्याचेही सांगितले. त्यांनी आपल्या पक्षाबद्दल आदर व्यक्त करत सांगितले की, मंत्री पद पक्षाने दिले, मी त्याचा आभारी आहे.

पण गप्प राहण्यासाठी किंवा पदासाठी नाही, तर नवी मुंबईतील भूखंड प्रश्नांवर योग्य तो निर्णय व्हावा म्हणून मी मंत्री पद स्वीकारले आहे. या वक्तव्याने सध्या राजकीय वर्तुळात खळबळ उडवली आहे.

मंत्री गणेश नाईक आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यातील वाद सर्वश्रुत आहे. निवडणूक कोणतीही असो गणेश नाईक हे नेहमीच एकनाथ शिंदेवर जोरदार हल्लाबोल करताना पाहायला मिळतात. महापालिका निवडणुकीमध्ये देखील नवी मुंबईमध्ये गणेश नाईक यांच्यावर अनेक आव्हानात्मक टीका केल्या होत्या, यामुळे भाजप आणि शिंदेसेनामध्ये वादंग ही निर्माण झाले होते. अशातच आज पुन्हा एकदा गणेश नाईक यांनी शिंदेवर जोरदार टीकास्त्र सोडले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com