

अक्षय बडवे
Sadabhau Khot News: बार्शी येथील एका शेतकऱ्याचा कांद्याचा टेम्पो पुणे महानगरपालिकेने जप्त केला होता. या गोष्टीच्या निषेधार्थ सदाभाऊ खोत यांनी आज सकाळपासून शनिवार वाडा ते पुणे महानगरपालिका असा सर्व शेतकऱ्यांना घेऊन मोर्चा काढला होता. या मोर्च्यादरम्यान सदाभाऊ खोत यांनी चांगलाच आक्रमक पवित्रा घेतल्याचे दिसून आले. (Latest Marathi News)
बार्शी येथील शेतकरी रमेश आरगडे यांचा टेम्पो पुणे महापालिकेने जप्त केला होता. त्यामुळे पालिकेने जप्त केलेला टेम्पो महापालिका अधिकाऱ्यांनी सोडतो असं सांगितले होते. त्यामुळे रमेश हे टेम्पो आणण्यासाठी गेले असता या पद्धतीचा कोणताही आदेश किंवा निरोप आम्हाला आलेला नाही. त्यामुळे आम्ही टेम्पो सोडू शकत नाही असं अधिकाऱ्यांनी सांगितलं.
पुणे महापालिकेने टेम्पो जप्त केल्याची माहिती कळताच या गोष्टीच्या विरोधात आज सकाळपासून शनिवार वाडा ते पुणे महानगरपालिका असा सर्व शेतकऱ्यांना घेऊन मोर्चा काढला होता.
या गोष्टीच्या विरोधात सदाभाऊ खोत यांनी महानगरपालिकेत घुसण्याचा प्रयत्न केला. परंतु प्रशासनाने दरवाजा न उघडल्याने गेटवर चढून सदाभाऊ खोत यांनी शेतकऱ्यांसोबत महानगरपालिकेत प्रवेश केला. पोलिसांसमोरच सदाभाऊ खोत यांनी गेटवरून चढून प्रवेश केला.
दरम्यान, अवकाळी पावसाने झालेल्या नुकसानीनवर प्रसार माध्यमांशी बोलताना भाष्य केलं. 'सरकारने शेतकऱ्यांना मदत द्यायला हवी. योग्य ते निकष लावा आणि हेक्टरी किती मदत करता येईल, याबद्दल लवकरच जाहीर करावे. अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं आहे. राज्य सरकारने तातडीने मदतीची घोषणा करावी, अशी मागणी खोत यांनी केली.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.