Ravi Rana On Ajit Pawar: 'शरद पवारांच्या परवानगीने अजित पवार भाजपमध्ये जातील', आमदार रवी राणांचा खळबळजनक दावा!

Latest News: भाजप (BJP) संमर्थीत युवा सस्वाभिमान पक्षाचे आमदार रवी राणा (MLA Ravi Rana) यांनी अजित पवार यांच्यासंदर्भात मोठा गौप्यस्फोट केला आहे.
Ravi Rana And Ajit pawar
Ravi Rana And Ajit pawar Saam Tv

अमर घटारे, अमरावती

Amravati News: राज्यामध्ये सध्या सत्तांतराच्या चर्चा रंगल्या आहेत. अशामध्ये अजित पवार (Ajit Pawar) हे भाजपमध्ये जाणार असल्याची जोरदार चर्चा होत आहे. याचदरम्यान, भाजप (BJP) संमर्थीत युवा स्वाभिमान पक्षाचे आमदार रवी राणा (MLA Ravi Rana) यांनी अजित पवार यांच्यासंदर्भात मोठा गौप्यस्फोट केला आहे. 'शरद पवार यांच्या परवानगीनेच अजित पवार भाजपमध्ये जातील.', असा गौप्यस्फोट रवी राणा यांनी केला आहे. त्यांच्या या दाव्यामुळे पुन्हा राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.

Ravi Rana And Ajit pawar
7th Pay Commission: गुड न्यूज! केंद्रीय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता पुन्हा वाढणार, जाणून घ्या किती होणार पगार?

अजित पवार हे भाजपमध्ये जाऊन त्यांना समर्थन देतील अशा चर्चा होत असताना यावर आमदार रवी राणा यांनी खळबळजनक प्रतिक्रिया देत मोठा दावा केला आहे. 'अजित पवार हे 33 महिन्यांच्या सरकारला कंटाळलेले होते. त्यांचा श्वास तिथे गुदमरत होता. तर देवेंद्र फडणवीस, अमित शाह आणि नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वावर अजित पवार यांना विश्वास आहे. तसेच उद्धव ठाकरेच्या एकेरी धोरणामुळे अजित पवार कंटाळलेले होते. त्यामुळे लवकरच अजित पवार हे भाजपमध्ये जाऊन सरकारला पाठिंबा देतील.' असा खळबळजनक दावा रवी राणा यांनी केला आहे.

Ravi Rana And Ajit pawar
Amit Shah News: श्रीसदस्यांच्या जाण्याने माझे मन जड झाले; महाराष्ट्र भूषण सोहळ्यातील दुर्घटनेवर अमित शहांचं ट्विट

तसंच, 'शरद पवार यांनी उद्धव ठाकरे यांच्या डोक्यावरील हात काढला तर उद्धव ठाकरेंसोबत दोन आमदार सुद्धा राहणार नाही, अशी खोचक प्रतिक्रिया रवी राणा यांनी दिली. 'जेव्हा जेव्हा नरेंद्र मोदी, अमित शहा हिरवा कंदील देतील तेव्हा अजित पवार हे भाजपसोबत जातील. देशाचे पंतप्रधान आणि गृहमंत्री हिरवा कंदील केव्हाही देऊ शकतात तेव्हा अजित पवार पुन्हा नॉट रीचेबल होतील.' असे सुद्धा त्यांनी यावेळी सांगितले

Ravi Rana And Ajit pawar
Tata Motors Electric Cars : मुंबई-पुणे-मुंबई एक चार्जमध्ये गाठणार! Tata Nexon EV नवीन डार्क एडिशन लॉन्च, जाणून घ्या किंमत आणि रेंज

रवी राणा यांनी पुढे सांगितले की, 'शरद पवार आणि पंतप्रधान मोदी यांचे काय संबंध आहे हे महाराष्ट्राला माहिती आहे. दोघेही एकमेकांचा सन्मान करता. त्यामुळे आदित्य ठाकरे आणि संजय राऊत, उद्धव ठाकरे यांनी सिल्वर ओकवर जाऊन शरद पवार यांचे पाय पकडले. हे महाराष्ट्राने पाहिलं आहे. जेव्हा शरद पवार यांनी एक वक्तव्य केले तर उद्धव ठाकरे यांना शरद पवार यांचे पाय पकडावे लागले त्यांना माहीत आहे.'

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com