Tata Motors Electric Cars : मुंबई-पुणे-मुंबई एक चार्जमध्ये गाठणार! Tata Nexon EV नवीन डार्क एडिशन लॉन्च, जाणून घ्या किंमत आणि रेंज

मुंबई-पुणे-मुंबई एक चार्जमध्ये गाठणार! Tata Nexon EV नवीन डार्क एडिशन लॉन्च
Tata Nexon EV Max Dark Edition Launched
Tata Nexon EV Max Dark Edition Launched Saam Tv

Tata Nexon EV Max Dark Edition Launched : देशातील आघाडीची वाहन उत्पादक कंपनी टाटा मोटर्सने आज देशांतर्गत बाजारात आपली प्रसिद्ध इलेक्ट्रिक SUV Nexon EV चा नवीन डार्क एडिशन लॉन्च केला आहे. या नवीन डार्क एडिशनमध्ये कंपनीने काही खास फीचर्सचा समावेश केला आहे. तसेच याच्या बाह्य आणि आतील भागात ब्लॅक ट्रीटमेंट देण्यात आली आहे.

नवीन Nexon EV Max Dark Edition दोन प्रकारांमध्ये सादर करण्यात आली आहे. याच्या XZ Plus लक्झरी ट्रिमची किंमत 19.04 लाख रुपये आहे आणि 7.2kW चार्जरसह याची किंमत 19.54 लाख रुपये (एक्स-शोरूम) ठेवण्यात आली आहे. (Latest Auto News in Marathi)

Tata Nexon EV Max Dark Edition Launched
KTM ने लॉन्च केली 390 बाईक, पूर्वीपेक्षा 58,000 रुपयांनी कमी असेल किंमत

Nexon EV Max कंपनीने सुमारे एक वर्षापूर्वी बाजारात उतरवली होती. कंपनीने याचा डार्क, रेड डार्क, काझीरंगा आणि जेट एडिशन देखील बाजारात लॉन्च केले आहे. आता डार्क एडिशनमध्ये कंपनीने नवीन फीचर्ससह ही कार सादर केली आहे.

यात 10.25-इंचाची टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम देण्यात आलं आहे. जो या सेगमेंटमध्ये सर्वात मोठा आहे. फीचर्स म्हणून या इलेक्ट्रिक एसयूव्हीमध्ये व्हॉइस असिस्टंट, अपग्रेड केलेला रिव्हर्स कॅमेरा, स्पेशल ईव्ही डिस्प्ले थीम, वायरलेस कनेक्टिव्हिटी असेल. कंपनीचा दावा आहे की, ही SUV आता हिंदी, बंगाली, मराठी, तमिळ, तेलुगु आणि इंग्रजी या 6 वेगवेगळ्या भाषांमध्ये कमांड घेऊ शकते. (Latest Marathi News)

एका चार्जमध्ये मुंबई -पुणे-मुंबई गाठणार

कंपनीने या डार्क एडिशनच्या मेकॅनिझममध्ये कोणतेही मोठे बदल केलेले नाहीत. यामध्ये पूर्वीप्रमाणेच 40.5kWh क्षमतेचा बॅटरी पॅक देण्यात आला आहे. याची इलेक्ट्रिक मोटर 143hp पॉवर आणि 250Nm टॉर्क जनरेट करते. ही एसयूव्ही एका चार्जमध्ये मुंबई -पुणे-मुंबई गाठू शकते. ही SUV 453 किलोमीटर (ARAI) प्रमाणित रेंजसह येते. यात सिटी, इको आणि स्पोर्ट असे तीन ड्रायव्हिंग मोड आहेत.

Tata Nexon EV Max Dark Edition Launched
Cheapest Electric Cars: 'या' आहेत भारतातील सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार, पाहा संपूर्ण लिस्ट

Nexon EV Max Dark ला स्टँडर्ड म्हणून दोन चार्जर मिळतात - एक 3.3kW क्षमतेचा आणि दुसरा 7.2kW क्षमतेचा. लहान चार्जर सुमारे 15 तासांमध्ये 10 ते 100 टक्के बॅटरी चार्ज करते. तर दुसऱ्या चार्जरसह 0-100 टक्के चार्ज होण्यासाठी 6.5 तास लागतात, असा दावा कंपनीने कला आहे. हा डार्क एडिशन फास्ट चार्जिंगला देखील सपोर्ट करतो आणि कंपनीचा दावा आहे की, डीसी फास्ट चार्जरच्या मदतीने याची बॅटरी 56 मिनिटांत 0-80 टक्के चार्ज होते.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV Marathi News | साम टीव्ही
saamtv.esakal.com