Cheapest Electric Cars: 'या' आहेत भारतातील सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार, पाहा संपूर्ण लिस्ट

Cheapest Electric Cars in India: 'या' आहेत भारतातील सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार
Tata Tiago EV
Tata Tiago EVSaam TV

Affordable Electric Cars in India: देशात सध्या इलेक्ट्रिक कारची मागणी जोर धरू लागली आहे. अनेकजण इलेक्ट्रिक कार खरेदी करण्यास आपली पसंती दर्शवत आहे. मात्र यात असेही काही लोक आहे, ज्यांना या कार्सच्या अधिक किंमतीमुळे ती खरेदी करणं शक्य होत नाही.

अशातच तुम्हीही कमी किंमत इलेक्ट्रिक कार खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर आज आम्ही तुम्हाला भारतात उपलब्ध असलेल्या पाच सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कारची माहिती सांगणार आहोत. चला तर जाणून घेऊ कोणत्या आहेत या कार्स...

टाटा टियागो ईव्ही

Tata Tiago EV ला 19.2kWh आणि 24kWh चे दोन बॅटरी पॅक पर्याय मिळतात. दोन्ही बॅटरी पॅक इलेक्ट्रिक मोटरशी जोडलेले आहेत. जे लहान बॅटरीसह 61PS/110Nm आणि मोठ्या बॅटरीसह 75PS/114Nm आउटपुट जनरेट करतात. याला अनुक्रमे 250 किमी ते 315 किमीची रेंज मिळते. याची एक्स-शोरूम किंमत 8.69 लाख रुपयांपासून सुरू होते.  (Latest Marathi News)

Tata Tiago EV
Sports Bikes : जबरदस्त लूक आणि पॉवरफुल इंजिन; दमदार फीचर्ससह येतात 'या' जबरदस्त बाईक्स, पाहा संपूर्ण लिस्ट

सिट्रोन ई C3

फ्रेंच कंपनी Citroen च्या ऑल-इलेक्ट्रिक कार eC3 मध्ये 29.2kWh बॅटरी पॅक मिळतो. जो 57 PS पॉवर आणि 143 Nm टॉर्क आउटपुट जनरेट करणार्‍या इलेक्ट्रिक मोटरसह जोडलेला आहे. याला प्रति चार्ज 320 किमी एआरएआय प्रमाणित रेंज मिळते. eC3 15A प्लग पॉइंट चार्जरने 10 तास 30 मिनिटांत चार्ज केला जाऊ शकतो, तर DC फास्ट चार्जर केवळ 57 मिनिटांत 10 ते 80 टक्के चार्ज करू शकतो. याची एक्स-शोरूम किंमत 11.50 लाख रुपयांपासून सुरू होते. (Latest Auto News in Marathi)

टाटा टिगोर ईव्ही

Tata Tigor EV ला Ziptron EV तंत्रज्ञानासह 26kWh बॅटरी पॅक मिळतो. त्यातील इलेक्ट्रिक मोटर 75 PS पॉवर आणि 170 Nm टॉर्क जनरेट करते. या इलेक्ट्रिक सेडानला ARAI प्रमाणित 315 किमीची रेंज मिळते. वॉल चार्जर वापरून ही 0 ते 80 टक्के 8.5 तासांत आणि 25kW DC फास्ट चार्जर वापरून केवळ 60 मिनिटांत चार्ज करता येते. याची एक्स-शोरूम किंमत 12.49 लाख रुपये आहे.

Tata Tiago EV
Best Car's Under 5 lakhs In India: कमी किंमत आणि जबरदस्त मायलेज, पाच लाखांपेक्षा कमी किंमतीत येतात 'या' कार्स; पाहा संपूर्ण लिस्ट

Tata Nexon EV

Tata Nexon EV ची किंमत 14.99 लाख रुपयांपासून सुरू होते. यामध्ये 30.2 kWh क्षमतेचा बॅटरी पॅक उपलब्ध आहे. एकदा पूर्णपणे चार्ज केल्यानंतर ही कार सुमारे 312 किमीची रेंज देऊ शकते. याचा टॉप स्पीड 120 किमी/तास आहे. एका फास्ट चार्जरच्या साहाय्याने फक्त 60 मिनिटांत 0 ते 80% पर्यंत चार्ज करता येते. कारमध्ये 7-इंच टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम, ऑटोमॅटिक क्लायमेट कंट्रोल आणि सनरूफ सारखी फीचर्स देखील आहेत.

MG ZS EV

MG ZS EV ची किंमत सुमारे 22.5 लाख रुपये आहे आणि ती भारतातील सर्वात लोकप्रिय इलेक्ट्रिक कारपैकी एक आहे. ही एका चार्जवर सुमारे 419 किमीची रेंज देते आणि फास्ट चार्जर वापरून केवळ 50 मिनिटांत 0 ते 80% पर्यंत चार्ज केले जाऊ शकते. याचा टॉप स्पीड 140 किमी/तास आहे आणि त्याला 44.5 kWh बॅटरी पॅक मिळतो. या कारमध्ये पॅनोरॅमिक सनरूफ, 10.1-इंचाची टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम आणि इलेक्ट्रॉनिक पार्किंग ब्रेक सारखी फीचर्स उपलब्ध आहेत.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com