दसरा मेळाव्याआधी शिंदेसेनेचे टेन्शन वाढलं, सभेसाठी पदाधिकारी मिळेना?

Dussehra Rally Tension: दसरा मेळाव्याआधी एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेसमोर मुंबईतील संघटनात्मक बांधणीचं आव्हान. कांदिवली, चारकोप, शिवडी, कुलाबा आणि मलबार हिलमधील रखडलेल्या नियुक्त्यांमुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण.
EKANATH SHINDE SENA FACES MUMBAI ORGANIZATIONAL CHALLENGES AHEAD OF DUSSEHRA RALLY
EKANATH SHINDE SENA FACES MUMBAI ORGANIZATIONAL CHALLENGES AHEAD OF DUSSEHRA RALLYsaam tv
Published On: 

सुरज मसुरकर, साम टीव्ही

शिवसेनेत फुट पडल्यानंतर गेल्या 3 वर्षांपासून दोन दसरा मेळावा पार पडत आहे. यंदाही एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे यांचे दोन वेगवेगळे मेळावे पार पडणार आहे. ठाकरे यांची तोफ कोणावर धडाडणार? आणि शिंदे कोणावर घणाघात करणार? हे आजच्या मेळाव्यात दिसेल. अशातच शिवसेनेच्या दसरा मेळाव्याच्या पार्श्वभूमीवर मुंबईत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या संघटनात्मक बांधणीचा मुद्दा चर्चेत आला आहे. मुंबईतील काही भागांमध्ये अद्याप विभागप्रमुखांच्या नियुक्त्या झालेल्या नसल्याची माहिती समोर येत आहे. तर काही ठिकाणी पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या होऊनही अंतर्गत संघर्ष सुरू असल्याची चर्चा आहे. त्यामुळे पक्षातील इच्छुक आणि काही पदाधिकाऱ्यांमध्ये नाराजी असल्याचं बोललं जात आहे.

EKANATH SHINDE SENA FACES MUMBAI ORGANIZATIONAL CHALLENGES AHEAD OF DUSSEHRA RALLY
Gokul Election Result: गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीत महायुतीला झटका, सतेज पाटील यांच्या एकाकी झुंजेला यश, वाचा विजयाची इनसाईड स्टोरी

मुंबईतील कांदिवली आणि चारकोप या भागांमध्ये अद्याप विभागप्रमुखांची नियुक्ती झालेली नसल्याची माहिती आहे. त्याचबरोबर शिवडी, कुलाबा आणि मलबार हिल या भागांमध्ये पदाधिकाऱ्यांना बडतर्फ केल्यानंतर नवीन नियुक्त्या करण्यात आलेल्या नसल्याचं सांगितलं जात आहे. त्यामुळे या भागांतील संघटनात्मक जबाबदाऱ्या कोणाकडे सोपवल्या जाणार, याकडे लक्ष लागलं आहे.

EKANATH SHINDE SENA FACES MUMBAI ORGANIZATIONAL CHALLENGES AHEAD OF DUSSEHRA RALLY
मोहन भागवतांचा मोठा संदेश! स्वदेशी, सोशल मीडिया ते अमली पदार्थांवर काय म्हणाले?

काही ठिकाणी पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या झाल्या असल्या, तरी स्थानिक पातळीवर अंतर्गत मतभेद आणि संघर्ष असल्याची चर्चा आहे. दुसरीकडे, नवीन नियुक्त्यांसाठी इच्छुक असलेल्या कार्यकर्त्यांना निर्णयाची प्रतीक्षा करावी लागत असल्याने त्यांच्यात नाराजी असल्याचंही बोललं जात आहे. दसरा मेळाव्याच्या पार्श्वभूमीवर पक्ष संघटनेला बळकटी देण्याचं आव्हान शिंदेंच्या शिवसेनेसमोर असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. मुंबईतील रखडलेल्या नियुक्त्यांबाबत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे कधी निर्णय घेणार आणि संघटनात्मक फेरबदल कसे होणार, याकडे आता लक्ष लागलं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com