मोहन भागवतांचा मोठा संदेश! स्वदेशी, सोशल मीडिया ते अमली पदार्थांवर काय म्हणाले?

RSS Chief Mohan Bhagwat Emphasises Cultural Values: राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शताब्दी वर्षानिमित्त मोहन भागवत यांचा स्वबोध, स्वदेशी, सामाजिक समरसता आणि राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश दिला. तसेच सोशल मीडिया, ओटीटी आणि अमली पदार्थांच्या व्यसनावरही त्यांनी चिंता व्यक्त केली.
RSS Centenary Celebrations
RSS Centenary Celebrationssaam tv
Published On: 

पराग ढोबळे, साम टीव्ही

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शताब्दी वर्षानिमित्त आयोजित विजयादशमी उत्सवात सरसंघचालक मोहन भागवत यांनी स्वबोधम, स्वदेशी, सामाजिक समरसता, विवेकाधिष्ठित आचरण आणि राष्ट्रीय एकात्मेतेवर भर दिला. भारताची सनातन जीवनदृष्टी ही विवेधतेतून एकात्मता साधणारी असून देशाला संघटित आणि सामर्थ्यसंपन्न करण्यासाठी समाजाने आपल्या सांस्कृतिक मूल्यांचे जतन करणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन त्यांनी केले. संघाच्या शंभर वर्षांच्या कार्याचा आढावा घेताना भागवत यांनी समाजातील विविध घटकांपर्यंत पोहोचण्यासाठी राबवण्यात आलेल्या उपक्रमांची माहिती दिली. शताब्दी वर्षानिमित्त सुरू केलेल्या पाच परिवर्तनकारी उपक्रमांचा विस्तार समाजात करण्यासाठी स्वयंसेवक प्रयत्न करणार असल्याचेही त्यांनी सांगितले. यामध्ये स्वबोध जागृत करणे आणि स्वदेशीचा दैनंदिन जीवनात स्वीकार करणे यांना महत्त्व देण्यात आले आहे.

संत रविदास, स्वामी श्रद्धानंद यांच्या कार्याचे स्मरण

यावेळी मोहन भागवत यांनी संत शिरोमणी रविदास महाराज यांच्या 650 व्या जयंती वर्षाचा उल्लेख केला. संत रविदास यांनी आपल्या जीवनातून भक्ती, स्वधर्मानिष्ठा आणि सामाजिक समरसतेचा संदेश दिला. त्यांचे विचार आजही समाजासाठी प्रेरणादायी असल्याचे नमूद केले. स्वामी श्रद्धानंद यांच्या बलिदानाला शंभर वर्षे पूर्ण होत असल्याचा तसेच स्वामी लक्ष्मणानंद सरस्वती यांच्या जन्मशताब्दी वर्षाचाही त्यांनी उल्लेख केला. बंगालमधील हिंदू मेळ्याचे प्रेरक राजनारायण बसू यांच्या द्विशताब्दी जयंती वर्षाच्या पार्श्वभूमीवर स्वबोध आणि स्वदेशीच्या विचारांचे महत्त्वही त्यांनी अधोरेखित केले.

विविधतेतील एकात्मता हाच भारताचा आधार

भारतामध्ये धर्म, पंथ, भाषा, जात, प्रांत, खानपान आणि परंपरांमध्ये विविधता असली, तरी भावनिक एकात्मता हा देशाचा महत्त्वाचा आधार आहे. सर्व विविधतांचा स्वीकार करून त्यांचा सन्मान करणे आणि कालबाह्य झालेल्या गोष्टींमध्ये आवश्यक बदल करण्याची लवचीकता ठेवणे, हा भारताच्या सनातन परंपरेचा स्वभाव असल्याचे भागवत म्हणाले.

सोशल मीडिया, ओटीटी आणि अमली पदार्थांच्या व्यसनावर चिंता

आधुनिक काळात कुटुंबातील ज्येष्ठांकडून, शालेय अभ्यासक्रमातून आणि सामाजिक वातावरणातून मिळणाऱ्या संस्कारांचे प्रमाण कमी होत असल्याची चिंता मोहन भागवत यांनी व्यक्त केली. समाजमाध्यमांवरून मिळणारी माहिती योग्य की अयोग्य, याचा विवेक न करता स्वीकारल्यास त्याचे दुष्परिणाम होऊ शकतात, असे ते म्हणाले.

काही देशांनी समाजमध्यमांचा वापरावर नियम आणि निर्बंध लागू केले आहेत. भारतातही विशेषतः ओटीटी मंचांच्या संदर्भात, अशा उपाययोजनांची आवश्यकता असल्याची मागणी समाजातून होत असल्याचे त्यांनी नमूद केले. विवेकाच्या अभावामुळे तरुण पिढी अमली पदार्थांच्या व्यसनाच्या आहारी जात असल्याचे सांगत त्यांनी व्यसनमुक्तीसाठी प्रयत्न करण्याचे आवाहन केले.

RSS Centenary Celebrations
Pune Crime: पुणे हादरले! अनैतिक संबंधातून भरचौकात तरुणाची हत्या, चाकूने सपासप वार करत संपवलं

हिंदू जीवनदृष्टी म्हणजे आध्यात्मिकता, मानवता आणि विश्वबंधुत्व

भारताची सनातन जीवनदृष्टी हीच राष्ट्राची चेतना असल्याचे सांगताना भागवत यांनी हिंदू जीवनदृष्टीचा व्यापक अर्थ स्पष्ट केला. विशिष्ट उपासना पद्धती, जात, भाषा, प्रदेश, खानपान किंवा राजकीय विचारधारेपुरती ही जीवनदृष्टी मर्यादित नसून, आध्यात्मिकता, मानवता आणि विश्वबंधुत्व ही तिची प्रमुख वैशिष्ट्ये असल्याचे ते म्हणाले. विविधतेने नटलेल्या भारतीय समाजात परस्परांशी व्यवहार करताना मन, वाणी आणि कृतीत सद्भावना व आपलेपणा असणे आवश्यक असल्याचेही त्यांनी सांगितले.

संघाच्या सद्भावनेवर संशय निर्माण करण्याचे प्रयत्न

काही अवांछित घटनांचा आधार घेऊन संघाच्या सद्भावनेवर संशय निर्माण करण्याचे प्रयत्न केले जात असल्याचे मोहन भागवत यांनी म्हटले. अशा घटनांशी संघाचा संबंध नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. तसेच भारतासह जगातील सांस्कृतिक मूल्ये आणि मानवी संस्कारांसमोर आव्हाने उभी राहत असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com