शिवसेनेच्या बड्या नेत्याने राजकारण सोडलं, कार्यकर्त्यांची होणारी कोंडी...; खंत व्यक्त करत सगळंच सांगितलं

Ramesh Yevale Steps Away From Politics: आंबेगावचे शिवसेना नेते रमेश येवले यांनी राजकारणातून कायमचे बाजूला होण्याचा निर्णय घेतला आहे. सध्याच्या राजकीय परिस्थितीवर नाराजी व्यक्त करत त्यांनी जाहीर पत्रक प्रसिद्ध केले.
SHIV SENA LEADER RAMESH YEVALE QUITS POLITICS
SHIV SENA LEADER RAMESH YEVALE QUITS POLITICSsaam tv
Published On: 

रोहिदास गाडगे, साम टीव्ही

पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्याचे शिवसेनेचे नेते रमेश येवले यांनी राजकारणातून बाजूला होण्याचा निर्णय घेतला आहे. यासंदर्भात त्यांनी जाहीर पत्रक प्रसिद्ध करून आपली भूमिका स्पष्ट केली आहे. सध्याच्या राजकीय परिस्थितीवर नाराजी व्यक्त करत त्यांनी राजकीय विचारसरणी आणि राजकीय वाटचालीला कायमचा ब्रेक देत असल्याचे जाहीर केले आहे.

SHIV SENA LEADER RAMESH YEVALE QUITS POLITICS
उल्हासनगरमधील शिवसेना-भाजपचा वाद पेटला; आरोप-प्रत्यारोपांनी राजकारण तापलं, प्रकरण थेट पोलीस ठाण्यात पोहोचलं

आपल्या पत्रकात येवले म्हटले आहे की, सध्याची राजकीय परिस्थिती सर्वजण पाहत आहेत. असंवेदनशील राजकारणाच्या रेट्यात सर्वसामान्य जनता भरडली जात आहे. समाजात समतोल बिघडत चालला असून राजकीय मूल्यांचा स्तर दिवसेंदिवस घसरत आहे. अशा वातावरणात स्पष्ट बोलणाऱ्या आणि सरळ विचारसरणीच्या कार्यकर्त्यांची होणारी कोंडी आपण जवळून अनुभवली आहे. तत्वांशी तडजोड करून राजकारणात टिकून राहणे आपल्या स्वभावात नसल्याचेही त्यांनी पत्रकात नमूद केले आहे.

SHIV SENA LEADER RAMESH YEVALE QUITS POLITICS
Maharashtra Politics: एकनाथ शिंदेंना जोरदार धक्का, संपर्कप्रमुखांनी धनुष्यबाण सोडला; शेकडो कार्यकर्त्यांसह केली घरवापसी

या सर्व गोष्टींचा सखोल विचार करून आपण आपल्या राजकीय विचारसरणीला आणि राजकीय वाटचालीला कायमचा ब्रेक देण्याचा निर्णय घेतल्याचे येवले यांनी जाहीर केले आहे. विशेष म्हणजे हा शेवट नसून सुरुवात असल्याचे त्यांनी म्हटले आहे. आंबेगाव मतदारसंघातून त्यांनी विधानसभा निवडणूक लढवण्याची तयारी केली होती. शिवसेना ठाकरे गटाकडून उमेदवारीसाठी ते इच्छुक होते. मात्र उमेदवारी न मिळाल्याने त्यांनी अपक्ष निवडणूक लढवण्याची तयारी होती. मात्र त्यांनी माघार घेत राष्ट्रवादी कॉँग्रेस पक्षाच्या प्रचारात सहभाग घेतला होता.

SHIV SENA LEADER RAMESH YEVALE QUITS POLITICS
Maharashtra Politics: एकनाथ शिंदेंची मोठी खेळी, ५ बड्या नेत्यांना फोडलं; समर्थकांसह हाती घेतलं 'धनुष्यबाण'

विधानसभा निवडणुकीनंतर येवले यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश करून लांडेवाडी येथे जनसंपर्क कार्यालय सुरू केले होते, या कार्यालयाच्या उद्घाटनासाठी एकनाथ शिंदे आले होते. राजकारणातून बाजूला होत असले तरी समाजसेवेचे कार्य सुरूच ठेवणार असल्याचे रमेश येवले यांनी स्पष्ट केले आहे. मोरया सामाजिक ट्रस्टच्या माध्यमातून गरजवंत कुटुंबांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणे, तसेच सर्वसामान्य कुटुंबातील मुला-मुलींचे सामुदायिक विवाह सोहळे सन्मानाने आणि आनंदाने पार पाडणे, हे उपक्रम सुरू ठेवणार असल्याचे त्यांनी सांगितले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.