Maharashtra Politics: एकनाथ शिंदेंची मोठी खेळी, ५ बड्या नेत्यांना फोडलं; समर्थकांसह हाती घेतलं 'धनुष्यबाण'

Eknath Shinde Political Move: अकोल्यात एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेची ताकद वाढली आहे. ५ अपक्ष नगरसेवकांनी आपल्या समर्थकांसह शिंदेसेनेत प्रवेश केला.
Maharashtra Politics: एकनाथ शिंदेंची मोठी खेळी, ५ बड्या नेत्यांना फोडलं; समर्थकांसह हाती घेतलं 'धनुष्यबाण'
Deputy CM Eknath Shinde saam tv
Published On: 
  • अकोल्यातील मूर्तिजापूर नगरपरिषद शिंदेसेनेची ताकद वाढली

  • ५ अपक्ष नगरसेवकांनी शिंदेसेनेत प्रवेश केला

  • एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत पाच नगरसेवकांचा शिवसेनेत प्रवेश

विधानपरिषद निवडणुकीच्या निकालानंतर महायुतीत वादाची ठिणगी उडाली. या निवडणुकीत महायुतीचा पराभव झाला. या पराभवाचे खापर भाजपने शिंदेसेनेवर फोडले. भाजप आणि शिंदेसेनेत सध्या आरोप प्रत्यारोप सुरू आहेत. अशातच अकोल्यामध्ये मोठी राजकीय घडामोड घडली. अकोल्यात शिंदेसेनेत मोठे इनकमिंग झाले. एकनाथ शिंदे यांनी मोठी खेळी करत ५ बड्या नेत्यांना फोडलं. अकोल्यातील ५ नगरसेवकांनी आपल्या समर्थकांसह शिंदेसेनेत प्रवेश केला. त्यामुळे अकोल्यात शिंदेसेनेची ताकद चांगलीच वाढली आहे.

अकोल्यातील मूर्तिजापूर नगरपरिषदेतील ५ अपक्ष नगरसेवकांनी आपल्या समर्थकांसह शिवसेनेत प्रवेश केला. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश सोहळा पार पडला. शिवसेनेत प्रवेश करणाऱ्या नगरसेवकांमध्ये संदीप दौलतराव सरनाईक, सारिता काळे पाटील, पूनम रवी मोडक, ममता कैलास महाजन आणि शुभांगी संदीप सरनाईक यांचा समावेश आहे. या सर्व नगरसेवकांनी आपल्या कार्यकर्त्यांसह शिवसेनेचा झेंडा हाती घेतला.

Maharashtra Politics: एकनाथ शिंदेंची मोठी खेळी, ५ बड्या नेत्यांना फोडलं; समर्थकांसह हाती घेतलं 'धनुष्यबाण'
Maharashtra Politics: मोठी बातमी! आमदार संजय गायकवाडांना झटका, उपमुख्यमंत्र्यांनी दिले निलंबनाचे आदेश

या पाचही नगरसेवकांनी ऑक्टोबर महिन्याच्या सुरुवातीला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निकटवर्तीय सहकारी ॲड. निलेश देशमुख यांची अकोल्यात भेट घेतली होती. त्यांच्यासोबत झालेल्या चर्चेनंतर त्यांनी शिवसेनेत प्रवेश करण्याचा निर्णय घेतला.

दरम्यान, अकोल्यातील शिवा मोहोड यांनीही शिवसेनेत प्रवेश केला आहे. मोहोड हे राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष, महानंदचे संचालक, अकोला जिल्हा दूध संघाचे संचालक, शिवसंग्रामचे जिल्हाध्यक्ष आणि अकोला महापालिकेचे माजी बांधकाम सभापती राहिले आहेत. या सर्वांचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पक्षात स्वागत केले. मूर्तिजापूरच्या ५ अपक्ष नगरसेवकांच्या प्रवेशामुळे नगरपालिकेत शिंदेसेनेचे बळ वाढलं.

Maharashtra Politics: एकनाथ शिंदेंची मोठी खेळी, ५ बड्या नेत्यांना फोडलं; समर्थकांसह हाती घेतलं 'धनुष्यबाण'
Maharashtra Politics: ठाकरेसेनेतून शिंदे गटात गेले, आता जाहीर नाराजी बोलून दाखवली; शिंदे संतापून म्हणाले, विचार करावा लागेल!

मूर्तिजापूर नगरपालिकेतील पक्षीय बलाबल -

एकूण जागा - २५

भाजप - ११

शिंदेसेना - ७

वंचित - ५

शरद पवार राष्ट्रवादी - २

Maharashtra Politics: एकनाथ शिंदेंची मोठी खेळी, ५ बड्या नेत्यांना फोडलं; समर्थकांसह हाती घेतलं 'धनुष्यबाण'
Maharashtra Politics: लायकी काढणाऱ्या निलेश राणेंना नवनाथ बन यांच्याकडून प्रत्युत्तर, थेट नारायण राणेंसोबतचा फोटो शेअर केला, म्हणाले...

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.