Maratha Reservation Latest News
Maratha Reservation Latest NewsSaam TV

Maratha Aarakshan: मराठा समाजाला आरक्षण नक्कीच मिळणार, पण कधी? बड्या नेत्याने थेट तारीखच सांगितली

Maratha Reservation News: मनोज जरांगे यांच्या या मागणीवर शिंदे गटाच्या बड्या नेत्याने प्रतिक्रिया दिली आहे.
Published on

Maratha Reservation Latest Marathi News

मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील आक्रमक झाले असून हजारो मराठा आंदोलकांसह अंतरवाली सराटी येथून त्यांनी मुंबईच्या दिशेने कूच केली आहे. लवकरात लवकर आरक्षण द्या, अन्यथा मुंबईत येऊन आमरण उपोषण करत मोठं आंदोलन करू, असा इशाराच त्यांनी राज्य सरकारला दिला आहे. दरम्यान, मनोज जरांगे यांच्या या मागणीवर शिंदे गटाच्या बड्या नेत्याने प्रतिक्रिया दिली आहे.  ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Maratha Reservation Latest News
Maratha Andolan: मनोज जरांगे आणि राज्य सरकारमधला तणाव वाढला? बोलणी फिस्कटली, चर्चेची दारं कायमचीच बंद?

"मराठा समाजाला १०० टक्के आरक्षण मिळणार, पण त्यासाठी जरांगे यांनी फेब्रुवारीपर्यंत सरकारला वेळ द्यावा, आम्ही फेब्रुवारीत विशेष अधिवेशन घेऊन मराठा समाजाला आरक्षण देणार आहोत. मराठा आरक्षणाबाबत (Maratha Reservation) मोठी घोषणा केली जाईल", अशी माहिती शिंदे गटातील नेते संजय सिरसाट यांनी दिली आहे.

संजय सिरसाट यांनी शनिवारी मुंबईत साम टीव्हीसोबत संवाद साधला. यावेळी त्यांनी मराठा समाजाला सरकार नक्कीच आरक्षण देईल, अशी हमी दिली. त्याचबरोबर त्यांनी ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्यावर जोरदार टीका देखील केली.

राज्याचे मुख्यमंत्री (Eknath Shinde) आणि गृहमंत्री हे मनोज जरांगे यांच्याकडे राजकीय प्यादे म्हणून बघत आहेत. राज्यातील सामाजिक परिस्थिती बिघडवण्याचा प्रयत्न करत आहेत, अशी टीका ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केली होती. त्यावर बोलताना जरांगे पाटील यांनी राऊतांचं थोबाडं शेकलं पाहिजे, असा घणाघातही सिरसाटांनी केला.

"मराठा आंदोलनाच्या इतिहासात पहिल्यांदाच असं घडतंय, की सरकार सकारात्मक भूमिका घेतंय. हैदराबाद येथून कुणबींच्या नोंदी आणल्या गेल्या आहेत. राज्य मागासवर्गीय आयोगाची पुर्नगठण करण्यात आलंय. नोंदीनुसार कुणबी प्रमाणपत्राचं वाटप करण्यात येत आहे. सरकार सर्व कामे बाजूला ठेवून मराठा समाजाला आरक्षण देण्याचं प्रयत्न करत" असल्याचंही सिरसाट म्हणाले.

दरम्यान, सरकारसोबत ४ भिंतीच्या आत चर्चा केली असती, तर मला सरकारनेच संपवलं असतं, असं मनोज जरांगे यांनी म्हटलं होतं. यावर उत्तर देताना सिरसाट म्हणाले, जर तुम्हाला संपवायचंच असतं, तर सरकारने मनमोकळ्यापणाने सरकारने चर्चाच केली नसती. ज्या व्यक्तीने छत्रपती शिवाजी महाराजांची शपथ घेतली, ती फसवण्यासाठी नाही, असंही सिरसाट म्हणाले.

Maratha Reservation Latest News
Maratha Aarakshan: मनोज जरांगे मुंबईत पोहचण्याआधीच मराठ्यांना आरक्षण मिळणार? पडद्यामागील हालचालींना वेग

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com