Maratha Andolan: मनोज जरांगे आणि राज्य सरकारमधला तणाव वाढला? बोलणी फिस्कटली, चर्चेची दारं कायमचीच बंद?

Maratha Andolan Mumbai: मराठा समाजाला नोंदीनुसार कुणबी प्रमाणपत्र देण्याचे आश्वासन देऊनही जरांगे मुंबईतील आंदोलनावर ठाम असल्याने त्यांच्यासोबत यापुढे कोणतीही चर्चा करणार नाही, अशी भूमिका राज्य सरकारमधील काही मंत्र्यांनी घेतल्याची माहिती आहे
Maratha Andolan Mumbai Latest Marathi News
Maratha Andolan Mumbai Latest Marathi NewsSaam TV
Published On

Maratha Andolan Latest Marathi News

मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील मुंबईत आंदोलन करण्यास ठाम आहेत. जालन्यातील अंतरवाली सराटी येथून हजारो मराठा बांधवांसह जरांगे आज मुंबईच्या दिशेने पायी निघाले आहेत. जरांगे यांच्या पायी यात्रेत मराठा बांधव मोठ्या संख्येने सहभागी होत आहेत. अशातच मनोज जरांगे आणि राज्य सरकार यांच्यातील तणाव वाढल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Maratha Andolan Mumbai Latest Marathi News
Maratha Aarakshan: मनोज जरांगे मुंबईत पोहचण्याआधीच मराठ्यांना आरक्षण मिळणार? पडद्यामागील हालचालींना वेग

मराठा समाजाला (Maratha Reservation) नोंदीनुसार कुणबी प्रमाणपत्र देण्याचे आश्वासन देऊनही जरांगे मुंबईतील आंदोलनावर ठाम असल्याने त्यांच्यासोबत यापुढे कोणतीही चर्चा करणार नाही, अशी भूमिका राज्य सरकारमधील काही मंत्र्यांनी घेतल्याची माहिती आहे. इतकंच नाही, तर सरकारमधील इतर नेत्यांनी देखील यावर एकमत दाखवलं आहे.

महाराष्ट्रात दररोज कुणबींच्या हजारो नोंदी सापडत असताना, तसंच पुढच्या महिन्यात अधिवेशन बोलावलं असताना मनोज जरांगेंचा (Manoj Jarange Patil) मोर्चा कशासाठी? असा सवाल महायुती सरकारमधील मंत्री शंभुराज देसाई आणि संजय सिरसाट यांनी उपस्थित केला आहे.

मराठा आरक्षणाचा मुद्दा कायमचा मार्गी लावण्यासाठी राज्य सरकारला आणखी काही दिवसांचा वेळ हवा आहे. सरकार आरक्षणासाठी प्रयत्नशील असल्याचं शंभुराज देसाई यांनी सांगितलं आहे. जरांगे दररोज आपल्या मागण्या बदलत असल्याने सरकारमधील काही मंत्र्यांमध्ये नाराजी पसरल्याचं सांगितलं जातंय.

यापुढे जरांगे यांच्यासोबत कुणीही चर्चा करू नका, त्यांना मुंबईत येऊन आंदोलन करू द्या, अशी भूमिका काही मंत्र्यांनी घेतल्याचं सूत्रांनी सांगितलं आहे. त्यामुळे राज्य-सरकार आणि मनोज जरांगे यांच्यातील तणाव आणखीच वाढण्याची शक्यता आहे.

दरम्यान, यावर मनोज जरांगे पाटील यांची देखील प्रतिक्रिया आली आहे. सरकारकडून चर्चेचे दार बंद केले जात असतील, तर आमच्याकडूनही चर्चेचे दार आजपासून बंद झाली केली जाईल. सरकारला जे करायचं आहे ते करू द्या, आम्ही मुंबईत येऊन आरक्षण घेतल्याशिवाय माघारी परतणार नाही, असं देखील जरांगे यांनी स्पष्ट केलं आहे.

Maratha Andolan Mumbai Latest Marathi News
India Alliance Seat Sharing: इंडिया आघाडीच्या जागावाटपाची तारीख ठरली; महाराष्ट्रात कसा असेल फॉर्म्युला?

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com