India Alliance Seat Sharing: इंडिया आघाडीच्या जागावाटपाची तारीख ठरली; महाराष्ट्रात कसा असेल फॉर्म्युला?

India Alliance Seat Sharing News: इंडिया आघाडीच्या जागावाटपाची तारीख ठरल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी आज दिली.
India Alliance Seat Sharing Latest News
India Alliance Seat Sharing Latest NewsSaam TV
Published On

India Alliance Seat Sharing Latest News

आगामी लोकसभा निवडणुकीसाठी आता काही महिन्यांचाच कालावधील शिल्लक उरला आहे. मे महिन्याच्या अखेरीस भारतात लोकसभेच्या निवडणुका होऊ शकतात, असा अंदाज राजकीय विश्लेषकांनी बांधला आहे.  ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

त्यामुळे येत्या निवडणुकीत केंद्रातील मोदी सरकारला पराभूत करण्यासाठी विरोधकांनी इंडिया आघाडीची मोट बांधली आहे. दरम्यान, इंडिया आघाडीच्या जागावाटपाची तारीख ठरल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी आज दिली.

India Alliance Seat Sharing Latest News
Maharashtra Politics: वयस्कर लोक संधी देत नाहीत, अजितदादांचा टोमणा; शरद पवारांचं खास शैलीत उत्तर...

जयंत पाटील यांनी आज मुंबईत माध्यमांसोबत संवाद साधला. यावेळी त्यांनी इंडिया आघाडीच्या जागावाटपाबाबत माहिती दिली. येत्या दोन ते तीन दिवसांत जागावाटपाबाबत आमची बैठक होमार असून २५ जानेवारीपर्यंत जागावाटपाचा फॉर्म्युला ठरेल, असं जयंत पाटील (Jayant Patil) यांनी सांगितलं आहे.

इंडिया आघाडीमधील जागावाटपासाठी एकाच दिवशी बैठक होणार असून सर्व पक्षाचे नेते मुंबईत एकत्रित येणार असल्याचं जयंत पाटील म्हणाले. त्याचबरोबर जागावाटपाचा तिढा लवकरच सुटेल, कुणीही नाराज होणार नाही. आमच्यात जागावाटपावरून कोणताही वाद नाही, असंही जयंत पाटील यांनी स्पष्ट केलं आहे. (Latest Marathi News)

दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी देखील आज सोलापूर येथील पत्रकारपरिषदेत इंडिया आघाडीच्या जागावाटपाबाबत माहिती दिली होती. वंचितचे नेते प्रकाश आंबेडकर यांना इंडिया आघाडीत घेण्याबाबत आमचं बोलणं झालं असून ४८ जागांपैखी ३५ जागांवर एकमत झाल्याचं पवार म्हणाले होते.

महाराष्ट्रात जागावाटपाचा कसा असेल फॉर्म्युला?

इंडिया आघाडीच्या महाराष्ट्रातील लोकसभा जागावाटपाचा फॉर्म्युला दिल्लीत ठरला असल्याचं सूत्रांनी सांगितलं आहे. या फॉर्म्युल्यानुसार, काँग्रेसला २१ ते २२ जागा मिळण्याची शक्यता आहे. तर शिवसेना ठाकरे गटाला १७ ते १८ जागा मिळण्याचा अंदाज आहे. याशिवाय राष्ट्रवादी शरद पवार गटाला ६ जागा आणि वंचित बहुजन आघाडी २ जागा, तर स्वाभिमानी शेतकरी संघटनेला १ जागा मिळणार, असल्याचं सूत्रांनी सांगितलं आहे.

India Alliance Seat Sharing Latest News
500 Rs Fine On Rahul Gandhi : राहुल गांधींना ठाण्याच्या कोर्टानं ठोठावला ५०० रुपयांचा दंड, काय आहे प्रकरण?

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com