संजय पाटलांची पत्रकारांना शिवीगाळ; एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया, नक्की काय म्हणाले?

Eknath Shinde reaction on Sanjay Patil controversy : पत्रकारांना धमकी दिल्याच्या वादानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. संजय पाटील यांच्या वक्तव्यामागील कारणांवर भाष्य करत त्यांनी दिलगिरी व्यक्त करण्याचा सल्लाही दिल्याचे सांगितले.
Eknath Shinde
Eknath ShindeSaam tv
Published On

खासदार संजय दिना पाटील यांनी पत्रकारांना अर्वाच्य भाषेत शिवीगाळ करत मारहाण करण्याची भाषा केल्यामुळे महाराष्ट्रात खळबळ उडाली आहे. संजय दिना पाटील यांच्या या वक्तव्यावरून पावसाळी अधिवेशनातही जोरदार खडाजंगी झाली. या संपूर्ण प्रकरणावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपली भूमिका मांडली. "संजय राऊत यांच्या रोजच्या वक्तव्यांमुळे संजय पाटील यांच्याकडून अनावधानाने असे वक्तव्य झाले. त्यांना पत्रकारांबद्दल आदरच आहे," असे शिंदे म्हणाले. दरम्यान, पत्रकारांना शिवीगाळ केल्याचा आणि धमकी दिल्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.

पत्रकारांशी बोलताना एकनाथ शिंदे म्हणाले, "घडलेल्या सर्व प्रकाराची मी सविस्तर माहिती घेत आहे. त्यानंतर तुमच्याशी सविस्तर बोलेन. या प्रकाराबाबत माझी संजय दिना पाटील यांच्याशी चर्चा झाली असून त्यांनी माझ्याकडे आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. पत्रकारांबद्दल चुकीचे वक्तव्य करण्याचा किंवा त्यांच्या भावना दुखावण्याचा आपला कोणताही हेतू नव्हता, असे संजय पाटील यांनी सांगितले."

Eknath Shinde
खासदार संजय पाटलांचा संयम सुटला! पत्रकारांना अर्वाच्य भाषेत शिवीगाळ करत दिला दम, पोलिसांसमोरच हायव्होल्टेज ड्रामा

संजय राऊत यांच्यामुळेच संजय पाटील असे बोलल्याचा दावा करत एकनाथ शिंदे पुढे म्हणाले, "संजय राऊत दररोज विरोधकांवर टीका करतात, अपशब्द वापरतात आणि घरात घुसून मारण्याची भाषा करतात. तसेच पत्रकारांसमोर खालच्या पातळीवर जाऊन बोलतात. याचाच राग संजय पाटील यांच्या मनात होता. पत्रकारांबद्दल त्यांच्या मनात कोणताही आदर कमी झालेला नाही. कोणत्याही नेत्यांने पत्रकारांबद्दल चुकीचे वक्तव्य करू नये, म्हणूनच संजय पाटील यांनी याप्रकरणी दिलगिरी व्यक्त करावी, असे मी त्यांना सांगितले आहे."

Eknath Shinde
Mumbai Crime : मुंबई हादरली! १० वर्षाच्या मुलासमोर महिलेवर बलात्कार; गळ्यावर कोयता ठेवून तडीपार गुंडाचं भयंकर कृत्य

ते पुढे म्हणाले, "२०२२ पासून संजय राऊत ज्या प्रकारची भाषा वापरत आहेत, ते अतिशय निंदनीय आहे. लोकशाहीत अशा प्रकारे शिवीगाळ करणे शोभत नाही. पत्रकारांसमोर ते कोणत्या थराला जाऊन बोलतात? यामुळे महाराष्ट्राची संस्कृती रसातळाला जात आहे. याचाच राग संजय पाटलांच्या मनात होता. तरीही, जे काही घडले ते अनावधानाने झाले असल्यामुळे, या प्रकरणी दिलगिरी व्यक्त करण्याची संजय पाटील यांची तयारी आहे."

Eknath Shinde
दुसऱ्या पुरुषाशी रात्री फोनवर बोलल्याने पत्नी चारित्र्यहीन ठरत नाही, न्यायालयाची मोठी टिप्पणी

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com