Eknath Shinde : मुंबईबाहेर गेलेल्या मराठी माणसांना पुन्हा मुंबईत आणणार, सामान्यांना घर मिळवून देणार; एकनाथ शिंदे यांची मोठी घोषणा

Mumbai News : मुंबईबाहेर गेलेल्या मराठी नागरिकांना पुन्हा शहरात परत आणण्यासाठी, रखडलेल्या पुनर्विकास प्रकल्पांना वेग देण्यासाठी आणि झोपडपट्टीमुक्त मुंबईच्या दिशेने ठोस प्रयत्न सुरू असल्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले.
Eknath Shinde
Eknath Shinde Saam Tv
Published On

Eknath Shinde News : मुंबईत सर्वसामान्यांचे घराचे स्वप्न साकार करण्यासाठी महायुती सरकार कटिबद्ध आहे. गेल्या अनेक वर्षांपासून रखडलेले पुनर्विकास प्रकल्प पूर्ण करून मुंबईबाहेर गेलेल्या मराठी माणसांना पुन्हा मुंबईत आणण्याचे काम सुरू आहे, असे वक्तव्य विधानसभेत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले आहे.

नियम २९३ अन्वये विधानसभेत झालेल्या चर्चेला उत्तर देताना उपमुख्यमंत्री म्हणाले की, महायुती सरकारच्या कार्यकाळात मुंबईसाठी सर्वाधिक काम झाले आहे. मुंबईचा खऱ्या अर्थाने कायापालट होत आहे. नागरिकांच्या जीवनात आमूलाग्र बदल घडवून आणणाऱ्या या कामांमुळे देशाच्या ‘ग्रोथ इंजिन’मध्ये मुंबईची भूमिका आणखी भक्कम होईल.

Eknath Shinde
Jitrendra Awhad : विधानसभेत गुंडांना प्रवेश देणार असाल तर... विधान भवनातील हाणामारीवर जितेंद्र आव्हाडांच्या संतापाचा कडेलोट

मुंबईतील रखडलेल्या पुनर्विकास प्रकल्पांना गती देण्यात आली आहे. गोरेगावच्या मोतीलाल नगर व जीटीपी नगरमध्ये समूह विकास प्रकल्पांसाठी विकासकांची नेमणूक झाली असून त्यामुळे ४९०० रहिवाशांना नवघर मिळणार आहे. कामाठीपुरा अभ्युदयनगरमधील प्रकल्पासाठी निविदा प्रक्रिया सुरू आहे. या माध्यमातून ११,४११ भाडेकरूंना लाभ होणार आहे. वांद्रे रिक्लेमेशन व आदर्शनगर, वरळी येथील क्लस्टर प्रकल्पांतून २०१० रहिवाशांना घरे मिळतील. बीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्पांतर्गत वरळी, नायगाव आणि ना. म. जोशी मार्गावरील एकूण १५,६०० रहिवाशांचे पुनर्वसन होणार आहे. यापैकी ५५६ सदनिकांचे वाटप १५ ऑगस्टपूर्वी करण्यात येईल. उर्वरित २५% सदनिकांचे वाटप डिसेंबर २०२५ पर्यंत होईल, अशी माहिती एकनाथ शिंदे यांनी दिली.

Eknath Shinde
Pune Accident : पुण्यात एसटी बसचा भीषण अपघात, खराब रस्त्यावरुन घसरली अन् बस थेट गटारात कोसळली

रमाबाई आंबेडकर नगर झोपडपट्टी पुनर्वसन

रमाबाई आंबेडकर नगरमधील झोपडपट्टीचे पुनर्वसन करताना त्यातून जाणाऱ्या पूर्वमुक्त मार्गाचे काम एमएमआरडीएमार्फत सुरू आहे. पहिल्या टप्प्यात ६१४४ झोपडीधारकांचे पुनर्वसन होणार आहे. झोपडपट्टीचे पुनर्वसन प्रकल्पासाठी निविदाही प्रसिद्ध झाली आहे, असे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभेत सांगितले

गिरणी कामगारांसाठी नवी घरे आणि हौसिंग स्टॉक

गिरणी कामगारांच्या घरांचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. २८ गिरण्यांच्या जागांवर गृहनिर्माण करून आतापर्यंत १३,१६१ कामगारांना घरे देण्यात आली आहेत. मुंबईतल्या बंद व आजारी गिरण्यांमध्ये एकूण १,७४,१७२ कामगारांची नोंद झाली आहे. गेल्या वर्षी घेतलेल्या निर्णयानुसार एमएमआर क्षेत्रात सुमारे १ लाख परवडणारी घरे उभारण्यात येणार आहेत. या प्रकल्पांसाठी सात ठिकाणी गृहनिर्माण प्रकल्प राबवले जातील. हौसिंग स्टॉक वाढवण्यासाठी नियमांत आवश्यक त्या सुधारणाही केल्या जातील, असे उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले.

Eknath Shinde
Pune Accidents : पुण्यात अपघातांची साखळी, एकाच ठिकाणी ३ तासांत १० अपघात; घटना सीसीटीव्हीत कैद

धारावी पुनर्विकास: ‘स्मार्ट मुंबई’कडे ऐतिहासिक वाटचाल

उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, धारावी पुनर्विकास प्रकल्प केवळ मुंबईसाठीच नव्हे, तर भारतासाठी अभिमानास्पद ठरणार आहे. हा प्रकल्प आशियातील सर्वात मोठा पुनर्विकास प्रकल्प ठरणार असून ७२,००० कुटुंबांचे पुनर्वसन करण्यात येईल. हा प्रकल्प फक्त घरापुरता मर्यादित नसून, रोजगार, शिक्षण, आरोग्य व सामाजिक सलोख्याचा एक मॉडेल असेल. ‘स्मार्ट मुंबई’च्या दिशेने हा एक ऐतिहासिक पाऊल आहे.

परवडणाऱ्या ३५ लाख घरांसाठी ७० हजार कोटींची गुंतवणूक

महायुती सरकारने नवीन गृहनिर्माण धोरण तयार केले असून, ७० हजार कोटी रुपयांच्या गुंतवणुकीतून ३५ लाख परवडणारी व पर्यावरणपूरक घरे बांधण्याचे लक्ष्य ठेवले आहे.मुंबईतील जुन्या इमारतींच्या पुनर्विकासासाठी महत्त्वाचे विधी सुधार केले असून, त्यामुळे अर्धवट सोडलेले प्रकल्प आता झपाट्याने पूर्ण होतील. रखडलेल्या एसआरए प्रकल्पांसाठी सरकारी संस्थांच्या माध्यमातून कामे पूर्ण करून ४० लाख झोपडपट्टीवासियांना घरे देण्याचे बाळासाहेब ठाकरे यांचे स्वप्न आम्ही पूर्ण करत आहोत, असे शिंदे म्हणाले.

Eknath Shinde
Retirement : २०२६ टी-२० वर्ल्डकपपूर्वी संघाला मोठा धक्का, मॅचविनर खेळाडूने केली निवृत्तीची घोषणा

मुंबईत खड्ड्यांसाठी ऑनलाईन तक्रार पोर्टल, IITसोबत करार

मुंबईतील रस्त्यांचे काँक्रीटीकरण सुरू असून, अद्याप अपूर्ण असलेल्या भागांमध्ये खड्ड्यांची तक्रार मोठ्या प्रमाणावर आहे. त्यामुळे मुंबई महापालिकेने झोननिहाय समर्पित एजन्सी नेमल्या असून, ऑनलाईन तक्रारींसाठी खास पोर्टल सुरू करण्यात आले आहे. या खड्ड्यांची तपासणी मुंबई IITच्या सहकार्याने केली जाणार आहे. यावर्षी खड्डे भरण्याचा खर्च मागील वर्षाच्या तुलनेत ५०% ने कमी झाला आहे, असेही उपमुख्यमंत्री शिंदे यांनी स्पष्ट केले.

आपला दवाखाना योजनेसाठी ११०६ कोटी रुपये

हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना योजनेअंतर्गत पुढील चार वर्षांसाठी ११०६ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. या दवाखान्यांमध्ये प्राथमिक व अद्ययावत चाचण्या मोफत मिळणार आहेत. राज्याच्या सर्वांगीण विकासाच्या प्रवासात सर्वांनी सहभागी व्हावे, असे आवाहनही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी केले.

Eknath Shinde
Crime : पतीला अडकवण्यासाठी कट आखला; पोटच्या मुलीची हत्या केली, कुजलेल्या मृतदेहासमोर महिलेनं बॉयफ्रेंडसोबत झोडली पार्टी

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com