Dombivli : इरशाळवाडीत ट्रेक करताना अचानक काय घडलं? डोंबिवलीच्या २० वर्षीय तरुणाचा मृत्यू

Irshalgad trek death : इरशाळवाडीत ट्रेकिंगसाठी गेलेल्या डोंबिवलीतील २० वर्षीय तरुणाचा अचानक मृत्यू झाला. उष्माघात किंवा हृदयविकाराच्या झटक्यामुळे मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात आला.
Irshalgad trek tragedy
Rescue efforts underway after a young trekker collapsed during an Irshalgad trek in Khalapur.Saam TV Marathi
Published On

संघर्ष गांगुर्डे/साम टीव्ही न्यूज/डोंबिवली

20 year old dies during Irshalgad trek : डोंबिवलीजवळील कोपरगाव परिसरात राहणाऱ्या २० वर्षीय तरुणाचा खालापूर तालुक्यातील प्रसिद्ध ट्रेकिंग स्थळ इरशाळवाडी येथे ट्रेकदरम्यान दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना रविवारी, ११ मे रोजी घडली. उष्माघात अथवा हृदयविकाराच्या झटक्यामुळे हा मृत्यू झाला असावा, असा प्राथमिक अंदाज डॉक्टरांनी व्यक्त केला आहे.

रितेश कोणका (वय २० वर्ष) असे मृत्यू पावलेल्या तरुणाचे नाव असून तो आपल्या मित्रांसोबत इरशाळवाडी येथे ट्रेकिंगसाठी गेला होता. ट्रेकदरम्यान अचानक त्याला अस्वस्थ वाटू लागले. मित्रांनी त्याला सावरण्याचा प्रयत्न केला, मात्र काही वेळातच तो बेशुद्ध पडला. या घटनेनंतर त्याच्या दोन मित्रांनी तातडीने इरशाळवाडीच्या पायथ्याशी धाव घेत स्थानिक ग्रामस्थांना माहिती दिली. माहिती मिळताच ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेत मदतकार्य सुरू केले. तसेच खालापूर पोलीस ठाण्यालाही घटनेची माहिती देण्यात आली.

Irshalgad trek tragedy
PM मोदी म्हणाले पेट्रोल-डिझेलची बचत करा; पण देशात किती दिवस पुरेल इतका साठा? सरकारची अधिकृत आकडेवारी

दरम्यान, मदतीसाठी हेल्प फाउंडेशनची टीमही रवाना होण्याच्या तयारीत होती; मात्र स्थानिक ग्रामस्थांनी परिस्थिती नियंत्रणात असल्याचे सांगत पारंपरिक झोळीच्या साहाय्याने रितेशला डोंगरावरून खाली आणले. पायथ्याशी आधीच रुग्णवाहिका आणि आवश्यक वैद्यकीय व्यवस्था सज्ज ठेवण्यात आली होती.

Irshalgad trek tragedy
पुण्यात खळबळ, हॉटेलच्या खोलीत आढळला प्रसिद्ध व्यावसायिकाचा मृतदेह, हत्या की घातपात?

यानंतर रितेशला तातडीने चौक ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र डॉक्टरांनी तपासणीनंतर त्याला मृत घोषित केले. प्राथमिक माहितीनुसार, उष्माघात किंवा हृदयविकाराच्या झटक्यामुळे त्याचा मृत्यू झाला असावा असा अंदाज आहे. शवविच्छेदन अहवालानंतर मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होणार असल्याची माहिती वैद्यकीय सूत्रांनी दिली. "उन्हाचा तडका जास्त असल्याने सध्या ट्रेकिंग करणे टाळावे," असे आवाहन गिर्यारोहक पवार यांनी सर्वांना केले आहे.

Irshalgad trek tragedy
Maharashtra Government : पंतप्रधान मोदींच्या आवाहनानंतर महाराष्ट्र सरकारनं घेतले ३ मोठे निर्णय, अधिकार्‍यांच्या दौऱ्यावर बंदी अन्...

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com