परवानगी १४ ची, बांधले २१ मजले! केडीएमसी अधिकाऱ्यांचे धक्कादायक कारनामे; बिल्डर आणि अधिकाऱ्यांची अशी झाली पोलखोल

21 Story Unauthorized Building In Raju Nagar Dombivli West: डोंबिवली पश्चिमेतील राजूनगर येथे १४ मजल्यांची परवानगी घेऊन २१ मजल्यांची इमारत बांधल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. शिवसेना नगरसेवक विकास म्हात्रे यांच्या तक्रारीनंतर केडीएमसीने बिल्डर आणि अधिकाऱ्यांवर कारवाई सुरू केली आहे.
DOMBIVLI SCAM: 21-STORY BUILDING BUILT ON 14-FLOOR PERMISSION; KDMC INITIATES LEGAL ACTION
DOMBIVLI SCAM: 21-STORY BUILDING BUILT ON 14-FLOOR PERMISSION; KDMC INITIATES LEGAL ACTIONsaam tv
Published On

संघर्ष गांगुर्डे, साम टीव्ही

डोंबिवली पश्चिम येथील राजूनगर परिसरात धक्कादायक अनधिकृत बांधकामाचा प्रकार समोर आला आहे. 14 मजली इमारतीची परवानगी घेऊन तब्बल 21 मजले उभारण्यात आले असल्याची धक्कादाक माहिती शिवसेना शिंदे गटाचे नगरसेवक विकास म्हात्रे यांनी उघडकीस आणले आहे. या प्रकरणी त्यांनी केडीएमसी आयुक्तांची भेट घेऊन संबंधित बिल्डर, आर्किटेक्ट आणि जबाबदार अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे.

संबंधित इमारतीसाठी केवळ 14 मजल्यांची परवानगी देण्यात आली होती. मात्र, त्यावर आणखी सात मजले अनधिकृतपणे बांधण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे. ही जागा संतोष भोईर आणि इतर लोकांच्या मालकीची असून, नीता वैती या इमारतीच्या विकासक असल्याचे सांगितले जात आहे. या प्रकरणाबाबत विकास म्हात्रे यांनी केडीएमसीकडे अधिकृत तक्रार दाखल केली असून, संपूर्ण बांधकामाची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे.

DOMBIVLI SCAM: 21-STORY BUILDING BUILT ON 14-FLOOR PERMISSION; KDMC INITIATES LEGAL ACTION
Pune University: पुणे विद्यापीठात बोगस डिग्री घोटाळा? 3 लाखांत B.Comच्या डिग्रीची विक्री?

65 अनधिकृत बांधकामांच्या प्रकरणाची चर्चा अद्याप सुरू असतानाच हा प्रकार समोर आल्याने केडीएमसीच्या कार्यपद्धतीवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. बिल्डर आणि काही अधिकारी यांच्या संगनमतामुळे अनधिकृत बांधकामांना प्रोत्साहन मिळत असून, त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांची तसेच शासनाची फसवणूक होत असल्याचा आरोप करण्यात येत आहे. या संपूर्ण प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी नागरिकांसह स्थानिक लोकप्रतिनिधींनी केली आहे.

DOMBIVLI SCAM: 21-STORY BUILDING BUILT ON 14-FLOOR PERMISSION; KDMC INITIATES LEGAL ACTION
Maharashtra News Live Update: मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गाला जोडणाऱ्या मुख्य रस्त्यावर पाच ते सहा किलोमीटर अंतरापर्यंत स्ट्रीट लाईट बंद

याबाबत केडीएमसीचे रचनाकार संतोष डोईफोडे यांनी सांगितले की संबंधित इमारती प्रकरणात महापालिकेने कारवाईला सुरुवात केली आहे .सात मजले अनधिकृत असल्याचे जाहीर करण्यात आले आहे. तसेच एम आर टी पी अंतर्गत देखील कारवाई केली जाणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com