एसीबीची मोठी कारवाई, BMC च्या बड्या अधिकाऱ्याला लाच घेताना रंगेहाथ पकडले, असा रचला सापळा

BMC water department bribery case latest new : मुंबईतील अंधेरी पश्चिम येथील बीएमसीच्या जलविभागातील अधिकाऱ्याला पाणी मीटर व पुनर्नळ जोडणीच्या कामासाठी ₹४० हजारांची लाच स्वीकारताना एसीबीने रंगेहाथ पकडले.
Anti Corruption Bureau officers detain a BMC water department official during a bribery trap in Mumbai.
ACB officials arrest a BMC water department officer in a bribery trap operation.Saam Tv
Published On

संजय गडदे, मुंबई प्रतिनिधी

ACB catches BMC official accepting bribe in Mumbai : अंधेरी पश्चिम येथील बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या 'के/पश्चिम' विभागातील जलविभागात पाणी मीटर व पुनर्नळ जोडणीच्या कामासाठी लाच मागितल्याप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) बुधवारी यशस्वी सापळा रचून जलमापक पर्यवेक्षकाला रंगेहाथ अटक केली. या कारवाईमुळे महापालिकेच्या जलविभागातील भ्रष्टाचार पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.

तक्रारदाराने २० जुलै २०२६ रोजी आपल्या दुकानासाठी पाणी मीटर व पुनर्नळ जोडणी मिळण्याबाबत अर्ज केला होता. या कामासाठी जलमापक पर्यवेक्षक विनोद भगवान राठोड आणि जलमापक निरीक्षक नंदन बाळकृष्ण मोरे यांनी सुरुवातीला १ लाख २० हजार रुपयांची लाच मागितल्याचा आरोप आहे. तडजोडीनंतर ८० हजार रुपयांवर व्यवहार निश्चित झाला. तसेच काम सुरू करण्यापूर्वी ४० हजार रुपयांचा पहिला हप्ता देण्याची मागणी करण्यात आली होती.

Anti Corruption Bureau officers detain a BMC water department official during a bribery trap in Mumbai.
Accident : भाजपच्या बड्या नेत्याचा अपघात, राष्ट्रीय महामार्गावर कारची ट्रकला जोरदार धडक

एसीबीने २९ जुलै रोजी तक्रारीची पडताळणी केली असता, जलमापक निरीक्षक नंदन मोरे यांनी तक्रारदाराला ४० हजार रुपयांची रक्कम जलमापक पर्यवेक्षक विनोद राठोड यांच्याकडे देण्यास सांगितल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर त्याच दिवशी एस. व्ही. रोडवरील 'टॉप-१० मोबाईल शॉप'समोरील फुटपाथवर सापळा रचण्यात आला. पंचांसमक्ष विनोद राठोड यांनी ४० हजार रुपयांची लाच स्वीकारताच एसीबीने त्यांना रंगेहाथ ताब्यात घेतले.

Anti Corruption Bureau officers detain a BMC water department official during a bribery trap in Mumbai.
Ladki Bahin Yojana : '३ दिवसात जुलै संपणार, ₹१५०० चा हप्ता कधी जमा होणार?'; 'या' तारखेबाबत समोर आली मोठी अपडेट

या प्रकरणात विनोद भगवान राठोड यांना अटक करण्यात आली असून नंदन बाळकृष्ण मोरे यांना फरारी (पाहिजे असलेला) आरोपी म्हणून नमूद करण्यात आले आहे. या दोघांविरुद्ध भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्याच्या कलम ७ अंतर्गत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

ही कारवाई पोलीस निरीक्षक अभिजित पाटील यांच्या नेतृत्वाखाली व साहाय्यक पोलीस आयुक्त मानसिंग पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. तसेच अपर पोलीस आयुक्त संदीप दिवाण आणि अपर पोलीस उपआयुक्त अनिल घेरडीकर यांनी या कारवाईचे मार्गदर्शन केले.

या पार्श्वभूमीवर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने नागरिकांना आवाहन केले आहे की, कोणत्याही शासकीय कामासाठी लाच मागितल्यास किंवा भ्रष्टाचाराची माहिती मिळाल्यास तत्काळ एसीबीशी संपर्क साधावा.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com