संघर्ष गांगुर्डे, साम टीव्ही
डोंबिवली शहरात बाप लेकीच्या पवित्र नात्याला काळिमा फसणारी एक संतापजनक घटना उघडकीस आली आहे. आपल्या दोन सख्या मुलींवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या एका नराधम बापाला मानपाडा पोलिसांनी अटक केली आहे. या घटनेमुळे परिसरात तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी हा कारपेंटरचे काम करत असून त्याला चार मुली आहेत. यापैकी एका मुलीचे वय १९ वर्षे तर दुसऱ्या मुलीचे वय १० वर्षे आहे. दहा वर्षांच्या अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार झाल्याची घटना नुकतीच समोर आली. तसेच १९ वर्षीय मुलीवर सुमारे एक वर्षापूर्वी आरोपी बापाने अत्याचार केल्याची बाब तपासात उघड झाली आहे.
या संपूर्ण प्रकाराची माहिती काही जागरूक नागरिकांना मिळाल्यानंतर त्यांनी तत्काळ पोलिसांशी संपर्क साधला. त्यानंतर मानपाडा पोलिसांनी तातडीने कारवाई करत आरोपीला अटक केली.
आरोपीने आपल्या इतर मुलींसोबतही अशाच प्रकारचे कृत्य केले आहे का, याचाही तपास पोलीस करत आहेत. तसेच या संपूर्ण प्रकरणात मुलींच्या आईची भूमिका काय होती, याचाही तपास मानपाडा पोलीस विविध अंगांनी करत आहेत. या घटनेनंतर डोंबिवली परिसरात मोठी खळबळ उडाली असून आरोपीवर कठोर कारवाई करण्याची मागणी होत आहे.पुढील तपास पोलीस करत आहेत.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.