सर्वसामान्यांना मोठा झटका; सीएनजीचा दर २ रुपयांनी वाढले, मध्यरात्रीपासून दरवाढ लागू

CNG rate news : सर्वसामान्यांना मोठा झटका बसला आहे. सीएनजीचा दर २ रुपयांनी वाढले आहेत.
CNG rate hike News
CNG rate hikeSaam tv
Published On
Summary

सीएनजीच्या दरात वाढ

सीएनजीचे दर २ रुपयांनी वाढले

आज मध्यरात्रीपासून नवे दर लागू

पुणे : सीएनजीच्या दरात पुन्हा वाढ झाली आहे. पुणे शहर, पिंपरी-चिंचवड, तळगाव आणि हिंजवडी परिसरात सीएनजीच्या दरात वाढ करण्यात आली आहे. सीएनजीच्या दरात प्रति किलो २ रुपयांनी वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे नवीन दर आज ९ आणि ९ मे २०२६ च्या मध्यरात्रीपासून लागू होणार आहेत.

सीएनजीच्या दरवाढीनंतर प्रति किलो दर ९२.२५ रुपयांवर पोहोचला आहे. नैसर्गिक वायूच्या वायूच्या खर्चात वाढ झाली आहे. त्यामुळे सीएनजीच्या दरात वाढ करण्यात आल्याचे महाराष्ट्र नॅचरल गॅस लिमिडेटने स्पष्ट केलं आहे. दरवाढ झाली तरी, सीएनजी इंधन पर्याय अजून किफायतशीर ठरत असल्याचा दावा कंपनीने केलाय.

CNG rate hike News
सर्वसामान्यांना झटका, घरगुती गॅस सिलिंडर महागणार? सरकार महत्वाचा निर्णय घेण्याच्या तयारीत

पुण्यात प्रवासी कारसाठी पेट्रोलच्या तुलनेत सुमारे ४५ टक्के आणि डिझेलच्या तुलनेत सुमारे २२ टक्के बचत होईल, असं सांगण्यात आलं आहे. ऑटोरिक्षा चालकांसाठी ही बचत सुमारे २४ टक्के असल्याचं सांगण्यात आलं आहे.

CNG rate hike News
LPG गॅस सिलिंडरनंतर महागाईचा आणखी एक झटका बसणार; पेट्रोल-डिझेलच्या किंमती पुन्हा वाढणार

नैसर्गिक वायू (पीएनजी)च्या दरात कोणताही बदल करण्यात आलेला नाही. ग्राहकांनी नवीन दराची नोंद घ्यावी, असेही कंपनीकडून सांगण्यात आलंय. पीएनजीच्या दरात न वाढ झाल्याने सर्वसामान्यांना मोठा दिलासा आहे.

महाराष्ट्रात पेट्रोल-डिझेलचे दर स्थिर

महाराष्ट्रात आज पेट्रोल डिझेलचे दर स्थिर असल्याचे पाहायला मिळाले. मुंबईत पेट्रोलचे दर १०४.४२ रुपये प्रति लिटर आहे. तर डिझेलचे दर ९०.०३ रुपये प्रति लिटर आहे. पुण्यात पेट्रोलचे दर १०३.८२ रुपये प्रति लिटर असून डिझेलचे दर ९०.३५ रुपये प्रति लिटर आहेत. ठाण्यात पेट्रोल १०३.९१ रुपये प्रति लिटर तर डिझेल ९०.४२ रुपये प्रति लिटर आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com