Dombivli : डोंबिवलीच्या रस्त्यावरती धिंगाणा! मधोमध गाडी उभी करून गप्पा ठोकणाऱ्या तिघांनी चोपला

Dombivli News : डोंबिवलीत किरकोळ वादातून कार चालकावर प्राणघातक हल्ला. तिघांना अटक करण्यात आली असून दोघे गंभीर जखमी आहेत.
Dombivli : डोंबिवलीच्या रस्त्यावरती धिंगाणा! मधोमध गाडी उभी करून गप्पा ठोकणाऱ्या तिघांनी चोपला
Dombivli NewsSaam Tv
Published On
Summary
  • डोंबिवलीत किरकोळ वादातून हिंसक हल्ला

  • कार चालक आणि मित्र गंभीर जखमी

  • तीन आरोपींना अटक

  • पोलिसांकडून पुढील तपास सुरू

संघर्ष गांगुर्डे, डोंबिवली

Dombivli Road Rage Attack Driver News डोंबिवलीतून मोठी बातमी समोर आली आहे. रस्त्यात गाडी उभी करून गप्पा मारत असलेल्या तिघांना बाजूला होण्यास सांगितल्याच्या कारणावरून, संतापलेल्या आरोपींनी कार चालक आणि त्याच्या मित्रावर प्राणघातक हल्ला केला. या हल्ल्यात कारचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून विष्णूनगर पोलिसांनी तिघांना अटक केली आहे.

मिळलेल्या माहितीनुसार, डोंबिवली पश्चिम येथील सत्यवान चौक परिसरात तीन तरुण मित्र रस्त्यामध्ये गाडी उभी करून गप्पा मारत होते. यावेळी अमित पाटील हे कारचालक त्या ठिकाणी आले. त्यांनी संबंधित तरुणांना गाडी बाजूला करण्यास सांगितले. मात्र, त्यांनी याकडे दुर्लक्ष केले. त्यानंतर अमित पाटील यांनी दोन ते तीन वेळा हॉर्न वाजवला.

Dombivli : डोंबिवलीच्या रस्त्यावरती धिंगाणा! मधोमध गाडी उभी करून गप्पा ठोकणाऱ्या तिघांनी चोपला
Shocking : लग्नाला नकार दिल्याने तरुणाचं भयंकर कृत्य, आधी जीभ कापली, नंतर गळा चिरून मुलीची हत्या

याचा राग आल्याने तिघांनी संतापाच्या भरात कार चालक अमित पाटील आणि त्यांच्या मित्र यश मात्रे यांच्यावर प्राणघातक हल्ला केला. रस्त्यावर पडलेले दगड उचलून त्यांनी दोघांनाही बेदम मारहाण केली. तसेच कारची तोडफोडही केली. या हल्ल्यात अमित पाटील आणि यश मात्रे हे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

Dombivli : डोंबिवलीच्या रस्त्यावरती धिंगाणा! मधोमध गाडी उभी करून गप्पा ठोकणाऱ्या तिघांनी चोपला
Crime News : दिल्ली हादरली! धावत्या कारमध्ये महिलेवर सामूहिक बलात्कार, रस्त्यावर फेकून दिलं नंतर...

या प्रकरणी विष्णूनगर पोलिसांनी प्रितेश उर्फ राम्या म्हात्रे, सचिन म्हात्रे आणि योगेश सुर्वे यांच्याविरोधात गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली आहे. आरोपींपैकी प्रितेश उर्फ राम्या म्हात्रे आणि सचिन म्हात्रे यांच्यावर यापूर्वीही गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल असल्याची माहिती समोर आली आहे. परिसरात या तरुणांची दहशत असल्याचेही बोलले जात आहे. अटक केलेल्या तिघांना कल्याण न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांना पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. पुढील तपास विष्णूनगर पोलीस करत असून या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com