Dombivli News : धक्कादायक! रिक्षाची धडक लागल्याने जाब विचारणाऱ्या दुचाकीस्वाराला डोंबिवलीत रॉडने मारहाण

Dombivli Crime News : रिक्षाची धडक लागल्याने एका दुचाकीस्वाराने रिक्षा चालकाला रिक्षा सावकाश चालवण्यास सांगितलं . त्यामुळे संतापलेल्याला रिक्षा चालकाने वाद घालत या दुचाकीस्वाराला चक्क रॉडने बेदम मारहाण केल्याची घटना डोंबिवली पश्चिम परिसरात घडली.
Dombivli News
Dombivli News Saam Digital
Published On: 

अभिजित देशमुख

रिक्षाची धडक लागल्याने एका दुचाकीस्वाराने रिक्षा चालकाला रिक्षा सावकाश चालवण्यास सांगितलं . त्यामुळे संतापलेल्याला रिक्षा चालकाने वाद घालत या दुचाकीस्वाराला चक्क रॉडने बेदम मारहाण केल्याची घटना डोंबिवली पश्चिम परिसरात घडली. या प्रकरणी विष्णूनगर पोलीस ठाण्यात या रिक्षाचालका विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय. हा रिक्षा चालक फरार असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली असून अशा मुजोर रिक्षा चालकांवर कारवाई करण्याची मागणी केली जात आहे.

डोंबिवली पश्चिमेतील कुंभारखान पाडा परिसरात राहणारे विशाल जाधव हे मार्केटींगचे काम करतात. शुक्रवारी संध्याकाळी त्यांच्या पत्नीला घेण्यासाठी डोंबिवली स्टेशनला गेले होते. स्टेशनच्या दिशेने दुचाकीवरुन जात असताना मागून एका रिक्षा चालकाने धडक दिली. विशाल हे दुचाकीसह रस्त्यावर पडले. गाडी उभी करून त्यांनी रिक्षाचालकास दादा रे रिक्षा संभाळून चालव. जीव घेणार का? असं सांगितलं.

Dombivli News
Pune News: धक्कादायक! स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या ५५० विद्यार्थ्यांना जेवणातून विषबाधा; उपचार सुरू

यावरुन संतापलेल्या रिक्षा चालकाने विशाल सोबत वाद घालण्यास सुरुवात केली. या वादा दरम्यान रिक्षा चालकाने त्याच्या रिक्षातून लोखंडी रॉड काढला. या लोखंडी रॉडने विशाल यांच्यावर हल्ला केला. या हल्ल्यात विशाल हे गंभीर जखमी झाले आहेत. त्यांना सात ते आठ टाके पडले आहेत. या घटनेनंतर रिक्षा चालक फरार झाला. रिक्षाचा नंबर विशाल यांनी विष्णूनगर पोलिसांना दिला आहे. या नंबरच्या सहाय्याने पोलीस रिक्षा चालकाचा शोध घेत आहेत. गेल्या काही दिवसांपासून रिक्षा चालकांनी प्रवाशी आणि वाहन चालकाना किरकोळ कारणावरून मारहाण केली आहे. त्यामुळे रिक्षा चालकांची मुजोरी कधी थांबणार असा सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.

Dombivli News
Mumbai Crime News: नात्याला काळिमा, घरातील एकट्या तरुणीवर पडली वाईट नजर; सावत्र आजोबाने केलं संतापजनक कृत्य

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com