डोंबिवलीत भोंदू बाबाकडून वृद्धाची फसवणूक
विधीच्या नावाखाली दागिने लंपास
विष्णू नगर पोलिसांनी आरोपीला अटक
नागरिकांना अंधश्रद्धेपासून दूर राहण्याचे आवाहन
संघर्ष गांगुर्डे, डोंबिवली
Dombivli Fake God Man Fraud News एकीकडे राज्यात नाशिकचा भोंदू अशोक खरातच प्रकरण गाजत असताना दुसरीकडे अशा अनेक भोंदू बाबांच पितळ उघड पडत आहे. नांदेडमध्ये एका भोंदू महाराजाने महिलेला लग्नाचे आमिष दाखवत तिच्यावर बलात्कार केला, तर आता डोंबिवली सारख्या गजबजलेल्या शहरात अंधश्रद्धेच्या नावाखाली फसवणुकीचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. मुलीच्या लग्नातील कथित दोष उतरवण्याच्या बहाण्याने एका भोंदू बाबाने वयोवृद्ध व्यक्तीला लुबाडल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी विष्णू नगर पोलिसांनी दीपक सावंत नावाच्या आरोपीला कल्याण येथून अटक केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पीडित व्यक्ती आपल्या मुलीच्या लग्नात अडथळे येत असल्याने उपाय शोधत होते. त्याच वेळी दीपक सावंत याने स्वतःला ‘बाबा’ म्हणून भासवत विशेष विधी करून दोष दूर करण्याचे आमिष दाखवले. विधीच्या नावाखाली त्याने पीडितांकडून सोन्याचे ब्रेसलेट आणि चांदीची लक्ष्मी नाणी घेतली.विधीदरम्यान आरोपीने हे दागिने लाल रंगाच्या रुमालात ठेवण्यास सांगितले आणि चलाखीने रुमालाची अदलाबदल केली.
त्यानंतर दुसरा रुमाल हातात देऊन तो तेथून पसार झाला. काही वेळाने फसवणूक झाल्याचे लक्षात येताच पीडितांनी विष्णू नगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.पोलिसांनी तातडीने तपास सुरू करून दीपक सावंत याला कल्याण परिसरातून अटक केली.
आरोपीने यापूर्वीही अशाच प्रकारे अनेकांना गंडा घातल्याची शक्यता असून, पोलिसांकडून सखोल चौकशी सुरू आहे.दरम्यान, नागरिकांनी अंधश्रद्धेला बळी न पडता कोणत्याही अशा विधी किंवा उपायांपासून सावध राहण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.