Dombivli Crime News: मद्याच्या दुकानातून आठ लाखांची रोकड चोरी; अवघ्या ४८ तासांत चोरटे अडकले पोलिसांच्या जाळ्यात

सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे आरोपींची ओळख पटवून ४८ तासांत या तिन्ही आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत.
Dombivli Crime News
Dombivli Crime NewsSaam tv
Published On

अभिजीत देशमुख

Dombivli Crime News: डोंबिवली पूर्वेकडे एका वाईन शॉपमधून आठ लाख रुपयांची चोरी झाल्याची घटना १२ जून रोजी घडली होती. या प्रकरणी पोलिसांनी आठ लाख रुपये चोरणाऱ्या त्रिकुटाला बेड्या ठोकल्या आहेत. सरूउद्दिन शेख ,जुबेर अन्सारी , शहाबुद्दीन शेख अशी या तीन चोरट्यांची नावे आहेत. तिघे वाईन शॉपमधील सीसीटीव्ही कॅमेरात काय झाले होते, या फुटेजच्या आधारे आरोपींची ओळख पटवून ४८ तासांत या तिन्ही आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत. (Latest Marathi News)

तिन्ही आरोपी सराईत गुन्हेगार असून सरूउद्दिन शेख विरोधात 15 घरफोडीचे गुन्हे तर जुबेर अन्सारी विरोधात 14 घरफोडीचे गुन्हे दाखल आहेत. त्यांच्याकडून साडेतीन लाखांची रोकड हस्तगत करण्यात आली आहे.

डोंबिवली पूर्वेकडील डीलक्स वाईन शॉपचे शटर उचकटून अज्ञात चोरट्यांनी आठ लाखांची रोकड चोरली. ही चोरीची घटना घटना १२ जून रोजी रात्रीच्या सुमारास अज्ञात घडली होती. याप्रकरणी रामनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

Dombivli Crime News
Mumbai Crime News : पत्नीला जाळण्याचा प्रयत्न करणाऱ्या आरोपी पतीला अटक; संशयाचं भूत डोक्यात शिरल्याने कृत्य

तिन्ही चोरटे सीसीटीव्ही कॅमेरात काय झाले होते, या सीसीटीव्ही फुटेज आधारे पोलिसांनी आरोपींची ओळख पटवली. डोंबिवली रामनगर पोलिसांनी या आरोपींच्या शोधासाठी पथक तयार केलं. त्यानंतर सीसीटीव्ही फुटेज तसेच तांत्रिक तपासाच्या आधारे सरूउद्दिन शेख ,जुबेर अन्सारी , शहाबुद्दीन शेख या तिघांना बेड्या ठोकल्या.

Dombivli Crime News
Bhandara Crime News: सासऱ्याने कुऱ्हाडीने वार करत केली सुनेची हत्या

तिघे सराईत चोरटे असून सरूउद्दिन विरोधात १५ तर जुबेर विरोधात १४ घरफोडीचे गुन्हे दाखल असल्याची माहिती पोलिसांनी दिली. या तिघांकडून साडेतीन लाखांची रक्कम पोलिसांनी हस्तगत केली. या प्रकरणी पोलीस पुढील तपास करत आहेत.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com