Bhandara Crime News: सासऱ्याने कुऱ्हाडीने वार करत केली सुनेची हत्या

सासऱ्याने कुऱ्हाडीने वार करत केली सुनेची हत्या
Bhandara Crime News
Bhandara Crime NewsSaam tv
Published On

शुभम देशमुख

भंडारा : सासऱ्यानेच कुऱ्हाडीने वार करत सुनेची हत्या केली. ही खळबळजनक घटना आज (१६ जून) सकाळी १० वाजताच्या सुमारास (Bhandara) भंडारा जिल्ह्यातील रोहना गावात घडली. प्रणाली सतीश ईश्वरकर (वय २४) असे मृत सुनेचे नावं आहे. तर सायाराम ईश्वरकर (वय ५७) असे पोलिसांनी (Police) अटक केलेल्या आरोपी सासऱ्याचे नावं आहे. (Latest Marathi News)

Bhandara Crime News
Jalgaon News: मुलादेखतच पित्याने विहिरीत उडी मारत संपविले जीवन; वडील बाहेर येतील म्‍हणून मुलगा तेथेच उभा

भंडारा जिल्‍ह्यातील रोहना येथील सयाराम ईश्वरकर व मृतक सून प्रणाली ईश्वरकर यांच्यात सकाळी भांडण झाले. भांडण इतके टोकाला गेले की सासऱ्याने घरातील कुऱ्हाड आणुन अंगणात भांडे धुत असलेल्या सुनेच्या (Crime News) मानेवर वार केला. यात प्रणाली ही रक्तबंबाड होउन जागीच कोसळली. अती रक्तस्त्राव झाल्याने तिचा जागीच मृत्यू झाला.

Bhandara Crime News
Ashadhi Wari 2023: लावणीच्या जुगलबंदीद्वारे वारकऱ्यांची सेवा; टाळ आणि घुंगरांचा झाला मिलाप

सासरा पोलिसांच्‍या ताब्‍यात

सदरची बातमी गावात वाऱ्यासारखी पसरताच गावकऱ्यांनी एकच गर्दी केली होती. याची माहिती मोहाडी पोलिसांना देण्यात आली असुन पोलिसांनी घटनस्थळी येत पंचनामा केला. तसेच आरोपी सासऱ्याला अटक केली आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com