बारामती : घुंगराचा छनछनाट, टाळ मृदुंगाचा नाद..लावणी आणि भक्तीगीतांचा मिलाप..अशा भक्तीमय (Baramati) वातावरणात आज वारकऱ्यांना भक्ती आणि लावणीच्या जुगलबंदीचा अवीट नमुना अनुभवायला मिळाला. पालखी सोहळा (Ashadhi Wari) चालत जात असताना लावणी नृत्यातून वारकऱ्यांची अनोखी सेवा या माध्यमातून केली जाते. (Breaking Marathi News)
जगदगुरु संत तुकाराम महाराजांचा पालखी सोहळा आज यवतहून वरवंडच्या दिशेने निघाला असताना केडगाव चौफुल्यावर या सोहळ्यातील वारकऱ्यांसाठी (Warkari) वाखारी येथील न्यू अंबिका कला केंद्राच्या नर्तीकानी आपली कला सादर केली. पालखी सोहळ्याच्या निमित्ताने वारकऱ्यांची सेवा करायची संधी मिळतेय. अन्नदानासह लावणीचं सादरीकरण करताना एक वेगळं समाधान मिळतं. या निमित्तानं बळीराजा सुखावला पाहिजे असंही साकडं येथील कलावंत घालतात.
गेल्या तीस वर्षांपासून कला केंद्राच्या माध्यमातून अन्नदान आणि मनोरंजनाचा कार्यक्रम आयोजित केला जात आहे. या केंद्रात जवळपास २०० कलावंत या सेवेत सहभाग होतात. लावणी आणि भक्तीगीतांच्या माध्यमातून वारकऱ्यांना मनोरंजनासह त्यांचा थकवा घालवण्याचा प्रयत्न केला जात आहे.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.