

दिशा सालियन मृत्यू प्रकरणात मोठी अपडेट
दिशा सालियन प्रकरणात ६ वर्षांनंतर CBI कडून गुन्हा दाखल
मुंबई हायकोर्टाच्या आदेशानंतर गुन्हा दाखल
दिशा सालियनच्या वडिलांचा जबाब नोंदवला
बॉलिवूडचा दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूतची एक्स मॅनेजर दिशा सालियनच्या मृत्यू प्रकरणात मोठी अपडेट समोर आली आहे. मुंबई हायकोर्टाच्या आदेशानुसार सीबीआयने या प्रकरणात गुन्हा दाखल केला आहे. दिशा सालियनच्या मृत्यूनंतर तब्बल ६ वर्षांनी या प्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सीबीआयने दिशा सालियनचे वडील सतीश सालियन यांचा जबाबही नोंदवला आहे. तब्बल चार तासांहून अधिक काल त्यांचा जबाब नोंदवून घेण्यात आला. हा जबाब प्राथमिक तपासाचा एक महत्त्वाचा भाग मानला जात आहे. दिशाच्या मृत्यूच्या सभोवतालच्या परिस्थितीची सखोल चौकशी करण्याचे आदेश कोर्टाने सीबीआयला दिले होते.
दिशा सालियनवर अत्याचारकरून तिची हत्या केल्याप्रकरणी सहा वर्षांनंतर गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणी सीबीआयने भा. दं. वि. कलम 302 (हत्या) 376 (सामूहिक अत्याचार), 120 (ब) कट रचणे, 201 (पुरावे नष्ट करणे) तसेच 217 आणि 218 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दिशाचे वडील सतीश सालियन यांनी आपल्या मुलीच्या मृत्यू प्रकरणी मुंबई हायकोर्टात याचिका दाखल केली आहे. त्यात त्यांनी आरोप केला आहे की, दिशावर सामूहिक बलात्कार करून तिची हत्या करण्यात आली. त्यांनी या प्रकरणात काही प्रभावशाली व्यक्ती आणि पोलीस अधिकाऱ्यांवरही गंभीर आरोप केले आहेत. हे सर्व आरोप सध्या तपासाचा भाग असून या प्रकरणाचा तपास सुरू आहे.
8 जून 2020 रोजी उत्तर मुंबईतील मालाड येथील एका बिल्डिंगच्या १४ व्या मजल्यावरून पडून सेलिब्रिटी मॅनेजर दिशा सालियनचा मृत्यू झाला. त्यानंतर पोलिसांनी अपघाती मृत्यूची नोंद केली होती. दिशाच्या मृत्यूनंतर काही दिवसांनी 14 जून रोजी सुशांत सिंह राजपूतने आत्महत्या केली. त्याच्या वांद्रे येथील घरी त्याने गळफास घेतला होता. दिशाच्या मृत्यू प्रकरणाची सुरुवातीला केवळ अपघाती मृत्यू म्हणून नोंद होती. आता ६ वर्षांनंतर या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला.
मुंबई हायकोर्टाच्या आदेशानंतर सीबीआयने या प्रकरणात गुन्हा दाखल केला. मागील सुनावणीदरम्यान, न्यायमूर्ती भारती डांगरे आणि मंजुषा देशपांडे यांच्या खंडपीठाने प्रश्न उपस्थित केला होता की, दिशाच्या कुटुंबीयांना हत्येचा संशय असूनही केवळ अपघाती मृत्यूचा अहवाल का दाखल करण्यात आला? कोर्टाने हेदेखील नमूद केले की, दिशाच्या मृत्यूनंतर जवळपास 5 वर्षे उलटली असली तरी तिच्या कुटुंबीयांना अद्याप तिच्या शवविच्छेदन अहवालाची आणि अपघाती मृत्यू अहवालाची प्रत देण्यात आलेली नाही. आता सीबीआय या प्रकरणाचा कसून तपास करत आहे. दिशाच्या मृत्यूच्या सर्व पैलूंवर सीबीआय माहिती गोळा करत आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.