बॉलीवूड अभिनेता डिनो मोरियाची 6 तास 45 मिनिटं चौकशी; सुटकेच्या आधी पोलिसांनी त्याला काय सांगितलं?

Dino Morea Questioned For 6 Hours 45 Minutes By Mumbai EOW: मिठी नदी गाळ उपसा कथित गैरव्यवहार प्रकरणात अभिनेता डिनो मोरियाची मुंबई आर्थिक गुन्हे शाखेने 6 तास 45 मिनिटे चौकशी केली. चौकशीनंतर त्यांना सोडण्यात आले.
DINO MOREA QUESTIONED FOR 6 HOURS 45 MINUTES IN MITHI RIVER CASE
DINO MOREA QUESTIONED FOR 6 HOURS 45 MINUTES IN MITHI RIVER CASEsaam tv
Published On: 

मिठी नदी गाळ उपसा कथित गैरव्यवहार प्रकरणात अभिनेता डिनो मोरियाची मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने आज चौकशी केली. सकाळी चौकशीसाठी बोलावण्यात आलेल्या डिनो मोरियाची तब्बल 6 तास 45 मिनिटे चौकशी करण्यात आली. चौकशी पूर्ण झाल्यानंतर पोलिसांनी त्याला सोडले.

DINO MOREA QUESTIONED FOR 6 HOURS 45 MINUTES IN MITHI RIVER CASE
Bollywood Actor Arrested: बॉलिवूडच्या प्रसिद्ध अभिनेत्याला अटक; मुंबई पोलिसांची कारवाई

तपासादरम्यान आर्थिक गुन्हे शाखेच्या हाती लागलेल्या काही महत्त्वाच्या धाग्यांच्या आधारे डिनो मोरियाकडे आज प्रश्नोत्तर करण्यात आल्याची माहिती आहे. यावेळी त्याचा जबाबही नोंदवण्यात आला. तसेच, तपासाशी संबंधित काही कागदपत्रे आर्थिक गुन्हे शाखेकडे सादर करण्यास मोरियाला सांगण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. या प्रकरणात डिनो मोरियाला सध्या अटक करण्यात आलेली नाही, तर केवळ चौकशी करण्यात आली आहे.

DINO MOREA QUESTIONED FOR 6 HOURS 45 MINUTES IN MITHI RIVER CASE
Mumbai Politics: मोठी बातमी! मुंबईत मनसेच्या बड्या नेत्याला अटक, राजकीय वर्तुळात खळबळ

मिठी नदीतील गाळ उपशाच्या कथित गैरव्यवहार प्रकरणात याआधीही डिनो मोरियाची चौकशी करण्यात आली होती. तपास पुढे जात असताना आवश्यकतेनुसार त्यांना पुन्हा चौकशीसाठी बोलावले जाऊ शकते, अशी माहिती सूत्रांकडून मिळत आहे. दरम्यान, आजच्या चौकशीनंतर आर्थिक गुन्हे शाखेच्या कार्यालयातून बाहेर पडताना डिनो मोरिया यांना पोलिसांनी सोडले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com