Bollywood Actor Arrested: बॉलिवूडच्या प्रसिद्ध अभिनेत्याला अटक; मुंबई पोलिसांची कारवाई

Bollywood Actor Arrested: मिठी नदी गाळ उपसा प्रकरणात अभिनेता डिनो मोरिया यांची आर्थिक गुन्हे शाखेकडून चौकशीनंतर अटक करण्यात आली. यापूर्वीही त्यांचे स्टेटमेंट रेकॉर्ड करण्यात आले होते.
Actor Dino Morea arrest
Actor Dino Morea arrestSaam Tv
Published On: 

Bollywood Actor Arrested: मुंबईतील बहुचर्चित मिठी नदी गाळ उपसा प्रकरणात अभिनेता डिनो मोरिया याची पुन्हा आर्थिक गुन्हे शाखेकडून (EOW) चौकशी केली जात आहे. मुंबई पोलीस आयुक्त कार्यालयातील गुन्हे शाखेच्या दालनात डिनो मोरिया चौकशीसाठी हजर झाल्याची माहिती समोर आली आहे. या प्रकरणात यापूर्वीही त्याची चौकशी करून स्टेटमेंट रेकॉर्ड करण्यात आले होते. आता तपासाचा भाग म्हणून त्यांना पुन्हा चौकशीसाठी बोलावण्यात आल्यानंतर अटक करण्यात आले.

मिठी नदी स्वच्छता आणि गाळ उपसा कामातील आर्थिक गैरव्यवहाराचा तपास मुंबई पोलिसांची आर्थिक गुन्हे शाखा करत आहे. या प्रकरणात मुंबई महापालिकेला ६५.५४ कोटी रुपयांहून अधिक नुकसान झाल्याचा आरोप तपास यंत्रणेने नोंदवला आहे. २०२१-२२ आणि २०२२-२३ या कालावधीतील गाळ उपसा कामांशी संबंधित कंत्राटे, आर्थिक व्यवहार आणि गाळ वाहतूक व विल्हेवाटीच्या प्रक्रियेतील अनियमिततेमुळे हा गैरव्यवहार निदर्शनेस आला.

Actor Dino Morea arrest
Drishyam 3 Review: अजय देवगणचा 'दृश्यम ३' थिएटरमध्ये पास की फेल; प्रेक्षकांनी दिले रिव्ह्यू

यापूर्वीही झाली होती चौकशी

डिनो मोरियाची मे २०२५ मध्ये आर्थिक गुन्हे शाखेने चौकशी केली होती. त्यानंतर काही दिवसांतच त्याला आणि त्याचा भाऊ सँटिनो मोरिया यांना पुन्हा चौकशीसाठी बोलावण्यात आले होते. त्यावेळी तपास अधिकाऱ्यांनी काही आर्थिक व्यवहार आणि संबंधित कागदपत्रांबाबत माहिती घेतली होती. मिठी नदी गाळ प्रकरणाच्या तपासात डिनो मोरियाचे नाव आरोपी व्यक्तींशी संबंधित असल्याने त्याच्यासोबत चौकशी करण्यात येत आहे. तपास यंत्रणांनी डिनो मोरिया आणि या प्रकरणातील आरोपी केतन कदम यांच्यातील आर्थिक व्यवहारांचीही चौकशी केली होती.

Actor Dino Morea arrest
Aadi Anant: अशोक सराफ आणि संकर्षण कऱ्हाडे यांच्या नात्याची हृदयस्पर्शी गोष्ट; 'आदि अनंत'चे पहिले पोस्टर प्रदर्शित

६५ कोटींच्या गैरव्यवहाराचा तपास

EOWच्या तपासानुसार, मिठी नदीतील गाळ उपसा कामाच्या कंत्राटांमध्ये आर्थिक अनियमितता झाल्याचा आरोप आहे. गाळ वाहतूक, विल्हेवाट आणि कंत्राटांशी संबंधित कागदपत्रांमध्ये गैरप्रकार झाल्याचा तपास यंत्रणेचा दावा आहे. या प्रकरणात कंत्राटदार, मध्यस्थ आणि महापालिकेच्या काही अधिकाऱ्यांची नावेही तपासात समोर आली आहेत. या प्रकरणात EOWने यापूर्वी १३ जणांविरोधात गुन्हा दाखल केल्याचे वृत्त आहे.

चौकशीतून काय समोर येणार?

आता डिनो मोरिया याची पुन्हा चौकशी होत असल्याने तपास यंत्रणा त्यांच्याकडून कोणती माहिती घेते, कोणती कागदपत्रे तपासली जातात आणि या प्रकरणातील आर्थिक व्यवहारांबाबत आणखी काय समोर येते, याकडे लक्ष लागले आहे. दरम्यान, या प्रकरणावरून भाजप आमदार नितेश राणे यांनी यापूर्वी डिनो मोरियावर सार्वजनिकरित्या आरोप केले आहेत. मिठी नदी गाळ उपसा प्रकरणातील पुढील चौकशीत नेमकी कोणती माहिती समोर येते, याकडे मुंबईकरांसह सर्वांचे लक्ष आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com