Drishyam 3 Review: अजय देवगणचा 'दृश्यम ३' थिएटरमध्ये पास की फेल; प्रेक्षकांनी दिले रिव्ह्यू

Drishyam 3 Review: अजय देवगणचा ‘दृश्यम ३’ प्रदर्शित होताच सोशल मीडियावर सस्पेन्स, ट्विस्ट आणि क्लायमॅक्सची चर्चा सुरू झाली. जयदीप अहलावतच्या अभिनयाचेही प्रेक्षकांकडून विशेष कौतुक होत आहे.
Drishyam 3 Review
Drishyam 3 ReviewSaam Tv
Published On: 

Drishyam 3 Review: ज्या चित्रपटाची प्रेक्षक बऱ्याच काळापासून आतुरतेने वाट पाहत होते, तो चित्रपट आज प्रदर्शित झाला आहे. अजय देवगण स्टारर ‘दृश्यम ३: द कन्क्लुजन’ २ ऑक्टोबर २०२६ रोजी प्रदर्शित झाला. प्रदर्शनानंतर सोशल मीडियावर चित्रपटाच्या प्रतिक्रिया समोर येऊ लागल्या असून, सस्पेन्स, ट्विस्ट आणि क्लायमॅक्सची विशेष चर्चा होत आहे.

अजय देवगण पुन्हा विजय साळगावकरच्या भूमिकेत

अभिषेक पाठक दिग्दर्शित ‘दृश्यम ३’ हा हिंदी फ्रँचायझीचा तिसरा आणि अंतिम भाग आहे. अजय देवगण पुन्हा एकदा विजय साळगावकरच्या भूमिकेत दिसत आहे. त्याच्यासोबत तब्बू, श्रिया सरन, प्रकाश राज आणि जयदीप अहलावत यांच्या महत्त्वपूर्ण भूमिका आहेत. यावेळी देखील विजयसमोर पुन्हा एकदा नव्या तपासाचे आव्हान उभे राहते.

Drishyam 3 Review
Pooja Birari: बांदेकरांच्या सुनबाईंचा मराठमोळा थाट! गुलाबी नऊवारीत पूजा बिरारीचा खुलला लूक

सस्पेन्स आणि ट्विस्टची सोशल मीडियावर चर्चा

चित्रपट पाहिल्यानंतर अनेक प्रेक्षकांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘एक्स’वर आपली प्रतिक्रिया व्यक्त केली. चित्रपटातील स्पॉयलर न सांगता काही युजर्सनी चित्रपटातील सस्पेन्सचे कौतुक केले आहे. विशेषतः इंटरव्हलनंतर स्टोरीत आणखी वाढलेल्या सस्पेन्सकडे प्रेक्षकांचे लक्ष वेधले गेले आहे.

Drishyam 3 Review
Rajpal Yadav Viral Video: 'तुम्हाला बाहेर जावं लागेल...'; मुश्ताक खान यांच्या शोकसभेतून राजपाल यादवला खरंच बाहेर काढलं?

जयदीप अहलावतच्या अभिनयाचेही कौतुक

‘दृश्यम ३’मध्ये जयदीप अहलावतची एंट्री महत्त्वाची ठरली आहे. तो एसपी राजवीर तोमरच्या भूमिकेत दिसत असून त्याच्या व्यक्तिरेखेने विजय साळगावकरसमोरील नवा पेच निर्णाण केल्याचे उत्तम प्रकारे मांडण्यात आले आहे. अजय देवगण आणि जयदीप अहलावत यांच्यातील स्क्रीनवरील संघर्षही चित्रपटातील चर्चेचा बेस्ट पार्ट असल्याचे एका नेटकऱ्याने म्हटले आहे.

प्रदर्शनापूर्वीच दमदार अॅडव्हान्स बुकिंग

प्रदर्शनापूर्वी ‘दृश्यम ३’च्या अॅडव्हान्स बुकिंगलाही चांगला प्रतिसाद मिळाला होता. ट्रेड ट्रॅकर Sacnilkच्या १ ऑक्टोबरच्या आकडेवारीनुसार, सहा शो दिवसांसाठी चित्रपटाने सुमारे ५१.४४ कोटी रुपयांचे ग्रॉस अॅडव्हान्स बुकिंग केले होते. त्यातील ब्लॉक सीट्स वगळता रक्कम सुमारे ४१.१७ कोटी रुपये हा चित्रपट कमवेल.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com