Pankaja Munde And Dhananjay Munde: पंकजांनी औक्षण केलं, धनंजय मुंडे झाले भावुक; बहीण-भावाच्या नात्यातील हळव्या क्षणांचा VIDEO पाहा!

Dhananjay Munde Met Pankaja Munde: राज्याचे नवे मंत्री झाल्यानंतर धनंजय मुंडे यांनी भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे यांची भेट घेतली.
Dhananjay Munde Met Pankaja Munde
Dhananjay Munde Met Pankaja MundeSaam Tv
Published On: 

Mumbai News: राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) पक्षामध्ये फूट पडल्यामुळे राज्याच्या राजकारणात मोठा राजकीय भूकंप झाला. अजित पवार (Ajit Pawar) यांनी काही आमदारांसोबत शिंदे-फडणवीस सरकारला (Shinde- Fadnavis Government) पाठिंबा देत उपमुख्यमंत्री (Maharashtra Deputy CM) पदाची शपथ घेतली.

अजित पवारांसोबत राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांनी देखील मंत्रिपदाची शपथ घेतली. राज्याचे नवे मंत्री झाल्यानंतर धनंजय मुंडे यांनी भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे यांची भेट घेतली. यावेळी मुंडे बहीण-भावाचे प्रेम पाहायला मिळाले. पंकजा मुंडे यांनी भाऊ धनंजय मुंडे यांचे औक्षण करत त्यांना शुभेच्छा दिल्या.

Dhananjay Munde Met Pankaja Munde
Asim Sarode On Ajit Pawar Group: अजित पवारांचा गट बेकायदेशीर, कायदेतज्ज्ञ असीम सरोदे यांचे मत

एकेकाळी मुंडे बहीण-भावातील कटूता बीड जिल्ह्यासह राज्याने पाहिली आहे. मात्र मागच्या सहा महिन्यांपासून मुंडे बहीण-भावांमधील दुरावा कमी झाल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. दोघांमध्ये वैचारिक मतभेद आहेत. तरी देखील या बहीण-भावाच्या नात्यातील प्रेम आज संपूर्ण महाराष्ट्राने पाहिले.

धनंजय मुंडे यांनी पंकजा मुंडे यांची भेट घेतल्यानंतर ट्विटरवर काही फोटो आणि व्हिडिओ शेअर करत भावनिक पोस्ट केली आहे. या भेटीवरुन कितीही वाद झाला तरी भावाच्या आनंदाच बहीण सहाभागी झाल्याचे चित्र पाहायला मिळाले. पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे यांच्या या भेटीचे फोटो व्हायरल होत आहेत. सध्या यावर राजकीय वर्तुळात चर्चा होत आहे.

धनंजय मुंडे यांनी या ट्विटमध्ये असे सांगितले आहे की, 'राज्याच्या मंत्रिपदी नियुक्ती नंतर माझ्या भगिनी तथा भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकडा मुंडे ताईने माझे औक्षण केले व शुभेच्छा दिल्या. भाजपची राष्ट्रीय सचिव म्हणून मीही ताईचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. आनंदाचा डोह असो किंवा दुःखाचा सागर, बहीण-भावाचे नाते कायमच अबाधित आहे.' धनंजय मुंडे यांचे हे भावनिक ट्वीट देखील चर्चेत आले आहे.

Dhananjay Munde Met Pankaja Munde
Maharashtra Politics: शिंदे सरकारच्या मंत्रिमंडळ विस्ताराची तारीख ठरली? तिसऱ्या टप्प्यात कोण घेणार शपथ?

दरम्ययान, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी रविवारी बंडखोरी करत काही आमदारांसोबत शिंदे-फडणवीस सरकारला पाठिंबा दिला. त्यानंतर अजित पवार यांनी राज्याच्या उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. अजित पवार यांच्यासोबत शिंदे-फडणवीस सरकारला पाठिंबा देणाऱ्या धनंजय मुंडे यांनी राज्याच्या मंत्रिपदाची शपथ घेतली. अजित पवारांसोबत एकूण ८ आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. अजित पवार यांच्या या भूमिकेमुळे राष्ट्रवादीमध्ये दोन गट पडले आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com