Maharashtra Politics: शिंदे सरकारच्या मंत्रिमंडळ विस्ताराची तारीख ठरली? तिसऱ्या टप्प्यात कोण घेणार शपथ?

९ जुलै किंवा १० जुलै रोजी शिंदे सरकारचा मंत्रिमंडळाचा विस्तार होण्याची शक्यता आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.
Maharashtra Politics Eknath Shinde, Devendra Fadnavis, Ajit Pawar News
Maharashtra Politics Eknath Shinde, Devendra Fadnavis, Ajit Pawar NewsSaam TV
Published On

सचिन सावंत, लक्ष्मण सोळुंके

Mumbai News: राष्ट्रवादी काँग्रेसमधील अजित पवार गटानं राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारला पाठिंबा जाहीर केला. अजित पवारांसह ९ आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. त्यानंतर राज्यातील राजकीय घडामोडींना वेग आला आहे. दुसरीकडे, राज्य मंत्रिमंडळाचा पुन्हा विस्तार होणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे. ९ किंवा १० जुलै रोजी उर्वरित मंत्रिमंडळाचा विस्तार करण्याचा युती सरकारचा मानस असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले.(Latest Marathi News)

विधीमंडळाचं पावसाळी अधिवेशन लवकरच होणार आहे. त्याचवेळी नवनिर्वाचित मंत्र्यांना मिळालेल्या संबंधित खात्याची माहिती असावी, या अनुषंगाने मंत्रिमंडळ विस्ताराच्या हालचालींना वेग आल्याचे समजते.

मंत्रिमंडळ विस्ताराबाबत काल, गुरुवारी रात्री मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांची नंदनवन या शासकीय निवासस्थानी बैठक झाली. उर्वरित मंत्रिमंडळाच्या विस्तारात भाजप आणि शिवसेनेच्याच आमदारांचा शपथविधी होणार असल्याची माहितीही सूत्रांकडून देण्यात आली.

Maharashtra Politics Eknath Shinde, Devendra Fadnavis, Ajit Pawar News
Pankaja Munde News: 'मला जे काही करायचंय ते डंके की चोट पर करेन'; पंकजा मुंडेंनी काँग्रेस प्रवेशाच्या चर्चांना दिला पूर्णविराम

बबनराव लोणीकरांची वर्णी लागणार?

जालना : अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. तर इतर आठ जणांनी मंत्रिपदाची शपथ घेतली आहे. त्यानंतर आता पुन्हा मंत्रिमंडळ विस्ताराच्या चर्चांना उधाण आलं आहे.

या चर्चा सुरू असतानाच, मंत्रिमंडळात मोठे फेरबदल होण्याचीही शक्यता आहे, असे सूत्रांनी सांगितले. येत्या काही दिवसांतच मंत्रिमंडळ विस्तार होणार आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, सध्याच्या मंत्रिमंडळातील ५ मंत्र्यांना डच्चू मिळणार आहे. तर भाजपच्या सात आमदारांना मंत्रिपद मिळू शकतं. जालन्याचे भाजप आमदार आणि माजी मंत्री बबनराव लोणीकर यांचीही मंत्रिमंडळात वर्णी लागेल, अशी चर्चा आहे.

Maharashtra Politics Eknath Shinde, Devendra Fadnavis, Ajit Pawar News
Rahul Gandhi Defamation Case: राहुल गांधी यांना गुजरात हायकोर्टाचा दणका; मानहानीच्या प्रकरणात 2 वर्षांची शिक्षा कायम

मराठवाड्यात शिवसेनेचे (शिंदे गट) सात आमदार आहेत. शिवसेनेला तीन मंत्रिपदे दिली आहेत. त्यात संदीपान भुमरे, अब्दुल सत्तार आणि तानाजी सावंत यांचा समावेश आहे. तर अजित पवार गटाकडून मराठवाड्यातील धनंजय मुंडे आणि संजय बनसोडे यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली आहे. तर भाजपकडे मराठवाड्यात १६ आमदार असताना पक्षाचा एकच मंत्री आहे. त्यामुळे मराठवाड्यातून भाजप आमदार लोणीकर यांची वर्णी लागणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com