Pankaja Munde News: 'मला जे काही करायचंय ते डंके की चोट पर करेन'; पंकजा मुंडेंनी काँग्रेस प्रवेशाच्या चर्चांना दिला पूर्णविराम

Pankaja Munde News: पंकजा मुंडे यांनी काँग्रेस प्रवेशाच्या चर्चांना पूर्णविराम दिला आहे.
Pankaja Munde
Pankaja MundeSaam tv
Published On

Pankaja Munde News: अजित पवार गटाने शिंदे सरकारला पाठिंबा दिल्यानंतर धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली आहे. दुसरीकडे गेल्या चार वर्षांपासून बहीण पंकजा मुंडे यांना भाजपकडून राज्यातील राजकारणात कोणतंही मोठं स्थान दिलं नाही. यामुळे पंकजा मुंडे नाराज असून काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली होती. पंकजा मुंडे यांनी काँग्रेस प्रवेशाच्या या चर्चांना पूर्णविराम दिला आहे.

'मला जे काही करायचंय ते डंके की चोट पर करेन, अशी प्रतिक्रिया पंकजा मुंडे यानी काँग्रेस प्रवेशांच्या चर्चांवर दिली आहे. (Latest Marathi News)

पंकजा मुंडे (Pankaja Munde) या मुंबईच्या दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यादरम्यान पंकजा मुंडे यांनी आज भाऊ धनंजय मुंडे यांची भेट घेतली. तसेच गेल्या काही दिवसांपासून पंकजा मुंडे यांच्या काँग्रेस प्रवेशाची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली होती.

आज पत्रकार परिषद घेत पंकजा मुंडे म्हणाल्या, ' 2019 मध्ये निवडणुकीत पराभूत झाल्यापासून अनेक चर्चा सुरू झाल्या आहेत. सर्व निवडणुकांमध्ये चर्चा झाल्या. कधीही जाहीरपणे सांगितलं नाही. मी कधीही नाराजी व्यक्त केली नाही. अनेक पक्षांच्या नेत्यांनी चर्चा केल्या की आमच्याकडे आल्या तर ही पदे देऊ ते देऊ असं सांगितलं'.

'सोनिया गांधी, राहुल गांधींची भेट घेतल्याचे वृत्त प्रसिद्ध झालं. ही बातमी खोटी आहे. ईश्वराला साक्ष ठेवून सांगते की, कोणत्याही पक्षाच्या कोणत्याही नेत्याशी पक्षप्रवेशाबाबत चर्चा झाली नाही, राहुल गांधींना प्रत्यक्ष बघितले आहे. सोनिया गांधी यांनाही बघितलं नाही, असे पंकजा मुंडे म्हणाल्या.

'काँग्रेस प्रवेशाविषयी बातमी आली, त्यावेळी मी मध्य प्रदेशात भाजपच्या कार्यक्रमात होती. ज्या माध्यमाकडे सूत्रांची माहिती आहे. त्या संबंधित माध्यम संस्थेवर मानहानीचा दावा ठोकणार आहे. त्यांनी माझ्या नैतिकतेवर प्रश्न उपस्थित केले आहेत, अशी माहिती पंकजा मुंडे यांनी दिली.

'माझ्यासारखे साधे, स्पष्ट पक्षाच्या कार्यकर्त्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत आहेत. माझ्याबद्दल अशी शंका उपस्थित केल्यानं मी दुःखी आहे. मी आजपर्यंत कुणाच्या वैयक्तिक जीवनात हस्तक्षेप केला नाही. मी धार्मिक तेढ वाढवणारे वक्तव्य केले नाही, अशा मुंडे पुढे म्हणाल्या.

'मी भाजपची सदस्य आहे. त्या संस्कारात वाढली आहे. माझ्याबद्दल जे झालं ते दुख देतं. मला जे काही करायचं आहे ते डंके की चोट पर करेन. २०१९ पासून या चर्चांमुळे मी थकली आहे. मला विश्रांतीची गरज आहे. त्यामुळे २ महिने ब्रेक घेत आहे, अशीही माहिती पंकजा मुंडे यांनी दिली.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com