मुंबईनंतर ठाणेकरांवर पाणी कपातीचे संकट; बारवी धरणातील साठा घटला

पावसाने दडी मारल्याने राज्यातील विविध धरणातील पाणीसाठा कमी हाेऊ लागला आहे.
water supply, thane
water supply, thaneSaam Tv

ठाणे : जून महिना संपला असून आणखी आठवडाभर पाऊस लांबला तर जुलैच्या पहिल्या आठवड्यापासून ठाणे (thane) जिल्ह्याला पाणी कपातीला सामोरे जावे लागणार अशी चिन्ह निर्माण झाली आहे. त्यामुळे नागरिकांनी पाणी जपून वापरणे गरजेचे बनले आहे. (thane latest marathi news)

जून महिना संपला तरी अजूनही म्हणावा तसा पाऊस न पडल्याने मुंबईत (mumbai) सोमवारपासून दहा टक्कें पाणी कपात करण्याचा निर्णय मुंबई महापालिकेने घेतला आहे. मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या धरणांमधील जलसाठा कमी झाल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे.

water supply, thane
तीस हजाराची लाच घेताना उच्च शिक्षण सहसंचालकास एसीबीने रंगेहाथ पकडलं

इकडे ठाणे जिल्ह्यात मात्र अजूनही पाणी कपातीविषयी कोणताही निर्णय पाटबंधारे विभागाने घेतलेला नाही. मात्र बारवी धरणात रविवारी ३१.५८ टक्के इतका पाणीसाठा होता. मात्र गेल्या वर्षीच्या तुलनेत धरणात पाणीसाठा तब्बल सात टक्के कमी आहे. २६ जून २०२१ रोजी बारवी धरणात ३८.५४ टक्के इतका पाणीसाठा होता. त्यामुळे आणखी आठवडाभर तरी पाणी कपात घोषित केली जाणार नाही अशी शक्यता आहे.

water supply, thane
Neeraj Chopra : डायमंड लीग स्पर्धेत नीरज चाेप्राची उत्तंग कामगिरी (व्हिडिओ पाहा)

दरम्यान त्यानंतरही समाधानकारक पाऊस (rain) पडला नाही तर २० ते २५ टक्के पाणी कपात करावी लागण्याची शक्यता संबंधित विभागातील सूत्रांनी दिली आहे. त्यामुळे नागरिकांनी पाणी जपून वापरावे असेही सूत्रांनी नमूद केले.

Edited By : Siddharth Latkar

water supply, thane
Ashadhi Wari 2022 : राज्यात चांगला पाऊस पडून शेतकऱ्यांच्या जीवनात उष:काल यावा : सहकारमंत्री बाळासाहेब पाटील
water supply, thane
Wimbledon 2022 : चुरशीच्या लढतीत अँडी मरेचा पराभव, चाहते हिरमुसले

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com