नवी दिल्ली : युवकांच्या (youth) गळ्यातील ताईत बनलेलल्या नीरज चोप्रानं (Neeraj Chopra) याने डायमंड लीग (Stockholm Diamond League) स्पर्धेत भालाफेकून पुन्हा एक नवा राष्ट्रीय विक्रम स्थापित केला आहे. या स्पर्धेत नीरजला रौप्यपदकावर (silver medal) समाधान मानावे लागले. (Neeraj Chopra Diamond League Latest Marathi News)
ऑलिम्पिक स्पर्धेतील सुवर्ण कामगिरीनंतर नीरज चाेप्रानं वेगवेळ्या स्पर्धांत उत्तम कामगिरी करण्यास प्रारंभ केला आहे. फिनलँडला झालेल्या स्पर्धेत नीरजने 89.30 मीटर अंतरावर भाला फेकून राष्ट्रीय विक्रम केला होता. गुरुवारी पुन्हा एकदा नीरजने डायमंड लीग स्पर्धेत उज्जवल कामगिरी केल्याने त्याचे समाज माध्यमातून काैतुक हाेऊ लागले आहे.
डायमंड लीग स्पर्धेत नीरजने पहिल्या प्रयत्नात 89.94 मीटर अंतरावर भालाफेकून पुन्हा एक नवा राष्ट्रीय विक्रम नोंदविला आहे. या स्पर्धेत जागतिक विजेत्या अँडरसन पीटर्सने (anderson peters) 90.31 मीटर अंतरावर भालाफेकून सुवर्णपदक (anderson peters bagged gold medal) जिंकले.
नीरज चौप्राची या स्पर्धेतील कामगिरी...
पहिला थ्राे - 89.94
दूसरा थ्राे - 84.37
तिसरा थ्राे - 87.46
चाैथा थ्राे - 84.77
पाचवा थ्राे - 86.67
सहावा थ्राे - 86.84
नीरज चाेप्राने मिळविलेल्या यशानंतर त्याचे समाज माध्यमातून काैतुक केले जात आहे.
Edited By : Siddharth Latkar
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.