Ashadhi Wari 2022 : राज्यात चांगला पाऊस पडून शेतकऱ्यांच्या जीवनात उष:काल यावा : सहकारमंत्री बाळासाहेब पाटील

प्रशासनाने पुरविल्या वारकऱ्यांना विविध सुविधा.
sant dnyaneshwar maharaj palkhi sohala, makrand patil, balasaheb patil, satara, lonand.
sant dnyaneshwar maharaj palkhi sohala, makrand patil, balasaheb patil, satara, lonand.saam tv news
Published On

सातारा : गेल्या दोन वर्षे कोरोना (corona) संसर्गाच्या संकटामुळे पालखी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले नाही. कोरोनाचे संकट काही प्रमाणात दूर झाले आहे. यामुळे यावर्षी पालखी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. पालखी सोहळ्यामध्ये उत्साह दिसत असून संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर पालखीचे (sant dnyaneshwar maharaj palkhi sohala) सातारा जिल्ह्यात आगमन झाले असून जिल्ह्यात सहा दिवसांचा मुक्काम आहे. वारकऱ्यांसाठी पिण्याचे पाणी, आरोग्य सुविधांसह इतर सुविधाही प्रशासनामार्फत उपलब्ध करुन देण्यात आल्या असल्याचे सांगून (satara) पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांनी राज्यात चांगला पाऊस पडूदे व सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या जीवनात उष:काल यावा अशी प्रार्थना केल्याचे सांगितले.

संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीचे टाळ मृदुंगाच्या गजरात आणि हरिनामाच्या जयघोषात मोठया आनंदाने आणि भक्तीमय वातावरणात सातारा जिल्ह्यात पाडेगाव येथे मंगळवारी आगमन झाले. फडफडणाऱ्या भगव्या पताका, टाळ मृदुंगाचा गजर आणि हरिभजनात तल्लीन होऊन संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर माऊलीचा पालखी सोहळा भक्तीरसात चिंब होऊन गेला.

sant dnyaneshwar maharaj palkhi sohala, makrand patil, balasaheb patil, satara, lonand.
Vice President Election 2022 : ऑगस्ट महिन्यात हाेणार उपराष्ट्रपतिपदाची निवडणूक

संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीचे सातारा जिल्ह्यात आगमन होताच जिल्ह्याच्या वतीने पालकमंत्री बाळासाहेब पाटील (Balasaheb Patil), खासदार श्रीनिवास पाटील (Shrinivas Patil), आमदार मकरंद पाटील (Makrand Patil), आमदार दिपक चव्हाण (Deepak Chavan), जिल्हाधिकारी शेखर सिंह (Shekhar Sinh), मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा, पोलीस अधीक्षक अजय कुमार बंसल, वाईचे प्रांताधिकारी राजेंद्र जाधव, फलटण प्रांताधिकारी शिवाजी जगताप यांच्यासह अन्य मान्यवर व वरिष्ठ अधिकारी यांनी पुष्प अर्पण करुन स्वागत केले.

sant dnyaneshwar maharaj palkhi sohala, makrand patil, balasaheb patil, satara, lonand.
Ashadhi Wari 2022 : आराेग्य विभागाची वारकऱ्यांना संजीवनी; साडेचार हजारांवर उपचार

प्रशासनाने पुरविल्या वारकऱ्यांना विविध सुविधा

संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज पालखीचा सातारा जिल्ह्यात सहा दिवस मुक्काम आहे. या पालखी सोहळ्यासोबत आलेल्या वारकऱ्यांसाठी जिल्हा प्रशासनाकडून, गॅस, स्वच्छ पिण्याचे पाणी, आरोग्य सुविधा पुरविण्यात येत असून वारकऱ्यांसाठी मोबाईल टॉयलेटही उपलब्ध करुन देण्यात आले आहेत. याचबरोबर पालखी सोहळ्यात कोणताही अनुचित प्रकार घडु नये यासाठी चोख पोलीस बंदोबस्तही ठेवण्यात आला आहे.

Edited By : Siddharth Latkar

sant dnyaneshwar maharaj palkhi sohala, makrand patil, balasaheb patil, satara, lonand.
Ashadhi Wari 2022 : ‘माउली, माउली’ जयघोषात पादुकांना नीरा स्नान संपन्न; लाेणंदनगरीत आगमन
sant dnyaneshwar maharaj palkhi sohala, makrand patil, balasaheb patil, satara, lonand.
सात दिवसांसाठी 70 खोल्या बुक; खाण्यापिण्यासह एकनाथ शिंदेंचा दररोज हाेताेय इतका खर्च
sant dnyaneshwar maharaj palkhi sohala, makrand patil, balasaheb patil, satara, lonand.
ठाकरे सरकार वाचविण्यासाठी मलिक, देशमुखांची धडपड; सर्वाेच्च न्यायालयात धाव

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com