सातारा : ‘माउली, माउली’ असा जयघोषात करीत आज (मंगळवार) संत ज्ञानेश्वर माउलींच्या पालखी सोहळ्याचे (sant dnyaneshwar maharaj palkhi sohala) सातारा (satara) जिल्ह्यात आगमन झाले. निरा नदीत (nira river) माऊलींच्या पादुकांना स्नान घालण्यात आले. आज लोणंद गावी पालखीचा मुक्कामी असणार आहे. (ashadhi wari 2022 latest marathi news)
काेविडच्या संकटामुळे गेल्या दोन वर्षांत पालखी सोहळा होऊ शकला नव्हता. यंदा वारीची सुरु झाल्याने माउलींच्या पादुकांच्या दर्शन घेण्यासाठी ठिक ठिकाणी भाविकांच्या गर्दी हाेत आहे. वाल्ह्यामधील विसाव्यानंतर आज वारकरी विठ्ठलाचा गजर करीत सातारा जिल्ह्यात पाेहचले.
लोणंद शहराच्या नजीक असलेल्या नीरा नदीच्या पुलावर पालख्यांच्या आगमन आणि पादुकांना नीरेतील सोहळा पाहण्यासाठी भाविकांनी सकाळपासून पूलावर गर्दी केली हाेती. पालख्या पुलावर येताच वारकरी, भाविकांनी ज्ञानेश्वर माउलींच्या नामाचा गजर केला. भक्तीमय वातावरणात पादुकांना नीरेत स्नान घालण्यात आले. त्यानंतर भाविका पादुकांचे दर्शन घेत हाेते.
Edited By : Siddharth Latkar
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.