T20 विश्वकरंडक स्पर्धेनंतरही टीम इंडियास विश्रांती नाही; न्यूझीलंड दाै-याचे वेळापत्रक जाहीर

नोव्हेंबर महिन्यात टीम इंडियाविरुद्ध मर्यादित षटकांची मालिका सुरु हाेईल.
India, New Zealand,
India, New Zealand, Saam Tv
Published On

मुंबई : टी विश्वकरंडक क्रिकेट स्पर्धेपुर्वी भारतीय क्रिकेट संघास विविध देशांचा दाैरा करावा लागणार हे आज (मंगळवार) निश्चित झाले आहे. न्यूझीलंडने त्यांच्या देशांतर्गत क्रिकेट (cricket) स्पर्धेचे वेळापत्रक जाहीर केले असून त्यात भारताविरुद्धच्या (team india) मर्यादित षटकांच्या मालिकेचा (India Tour of New Zealand 2022 Schedule) समावेश आहे. यामुळे टीम इंडियाला जादा सामने खेळण्यासाठी मिळत असले तरी विश्वकरंडक स्पर्धेपुर्वी त्यांची दमछाक हाेणार असेही मानले जात आहे.

भारताचा न्यूझीलंड दौरा नोव्हेंबरपासून सुरू होईल. भारतीय संघाचे सामने 18 नोव्हेंबरपासून सुरु हाेतील तर अंतिम सामना 30 नोव्हेंबरला होईल. या संपुर्ण दौऱ्यात भारतीय संघ 3 सामन्यांची टी-20 मालिका तसेच तितक्याच सामन्यांची एकदिवसीय मालिका खेळेल.

India, New Zealand,
देशातील टोल नाके हाेणार हद्दपार; जाणून घ्या नेमकं कारण

भारत - न्यूझीलंड दौऱ्याचं वेळापत्रक

पहिला टी -20 सामना - 18 नोव्हेंबर

दुसरा टी -20 सामना - 20 नोव्हेंबर

तिसरा टी -20 सामना - 22 नोव्हेंबर

पहिला एक दिवसीय सामना - 25 नोव्हेंबर

पहिला एक दिवसीय सामना - 27 नोव्हेंबर

पहिला एक दिवसीय सामना - 30 नोव्हेंबर

India, New Zealand,
माझ्यासाठी ताे क्षण हाेता Do Or Die; तान्ह्या बाळासह तिघींचे जीवन वाचविणारी आई म्हणाली...!

टी 20 विश्वकरंडक 2022 स्पर्धेच्या तयारीसाठी न्यूझीलंड क्रिकेट मंडळाने पाकिस्तान (pakistan) आणि बांगलादेश (bangladesh) यांच्या समवेत तिरंगी मालिका आयोजिण्याचा निर्णय घेतलाय. प्रदीर्घ कालावधीनंतर आंतरराष्ट्रीय स्तरावर तिरंगी मालिका होणार आहे. ही मालिका सात ऑक्टोबरपासून सुरू होईल. तसेच अंतिम सामना 14 ऑक्टोबरला होईल. त्यानंतर नोव्हेंबर महिन्यात टीम इंडियाविरुद्ध मर्यादित षटकांची मालिका सुरु हाेईल. ती झाल्यानंतर न्यूझीलंड फेब्रुवारी 2023 मध्ये मायदेशात इंग्लंडविरुद्ध दोन सामन्यांची कसोटी मालिका खेळेल.

Edited By : Siddharth Latkar

India, New Zealand,
Pallonji Mistry News : पद्म भूषण पालोनजी मिस्त्री यांचं निधन
India, New Zealand,
धमक्यांना भीक घालत नाही : अरुणा बर्गे
India, New Zealand,
शिवसेना अंगार है...बाकी सब भंगार है! संतप्त शिवसैनिक आजही उतरले रस्त्यावर

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com