कुत्र्यांच्या हल्ल्यात चिमुकल्याचा मृत्यू, नागरिक संतप्त; पालिका अधिकाऱ्यांवर खूनाचा गुन्हा दाखल करा !

साेमवारी कराड शहरानजीक घडलेल्या घटनेवरुन नागरिकांतून पालिकेच्या विराेधात तीव्र संताप व्यक्त हाेऊ लागला आहे.
street dogs, karad, children feared
street dogs, karad, children fearedsaam tv

सातारा : कराड (karad) शहरातील राजवीर राहूल ओव्हाळ (rajveer ovhal) या निष्पाप मुलाच्या मृत्यूस जबाबदार असणाऱ्या कराड पालिका प्रशासनातील जबाबदार अधिकाऱ्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा तसेच शहरातील मोकाट कुत्र्यांपासून (stray dogs) आबाल वृद्धांचे रक्षण करावे अशी मागणी क-हाडकरांच्यावतीने जाेर धरु लागली आहे. याबाबतचे निवेदन जिल्हा प्रशासनास तसेच पाेलीस मुख्यालयात (satara police) देणार असल्याची माहिती क-हाडकरांनी दिली. (karad latest marathi news)

वाखाण येथील जगताप यांच्या वस्तीनजीक राजवीर ओव्हाळ हा अडीच वर्षाचा चिमुकला साेमवारी त्याच्या घराजवळ खेळत हाेता. त्याला भटक्या कुत्र्यांनी नजकीच्या शेतात नेत त्याचा लचका ताेडला. त्यात त्याचा मृत्यू झाला. ओव्हाळ कुटुंबियांवर दुखाचा डाेंगर काेसळला.

street dogs, karad, children feared
T20 विश्वकरंडक स्पर्धेनंतरही टीम इंडियास विश्रांती नाही; न्यूझीलंड दाै-याचे वेळापत्रक जाहीर

दरम्यान या घटनेनंतर क-हाडकरांच्या पालिका प्रशासनाबाबत तीव्र प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. काही नागरिकांनी प्रशासनातील अधिका-यांवर गुन्हे दाखल झाल्यानंतरच त्यांचे डाेळे उघडतील अशा भावना व्यक्त केल्या आहेत.

street dogs, karad, children feared
Child Teeth Care: वाढत्या वयात मुलांच्या दातांची काळजी कशी घ्याल ?

क-हाडकर नागरिकांनी त्यांनी दिलेल्या निवेदनात राजवीर या निष्पाप मुलाच्या मृत्यूस सर्वस्वी कराड नगरपालिकेचे संबंधित प्रशासकीय अधिकारी जबाबदार आहेत. कराडकर नागरिकांनी मोकाट कुत्र्यांच्या बंदोबस्त करण्याबाबत समक्ष व निवेदनावाद्वारे नगरपरिषदेस वेळोवेळी मागणी केली होती, परंतु आम्ही केलेल्या मागणीकडे नगरपरिषदेने सोयीस्कर दुर्लक्ष केले आहे. मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करणे ही कराड नगरपरिषदेची जबाबदारी आहे. कराड नगरपरिषदेने मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त न केल्यामुळे एका निष्पाप मुलाचा जीव गेला आहे. त्यामुळे या मुलाच्या खुनास सर्वस्वी कराड नगरपरिषदेचे संबंधित अधिकारी जबाबदार आहेत, तरी संबंधित अधिकारी यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी केली आहे.

street dogs, karad, children feared
माकडाला चिप्स द्यायला गेला अन् पर्यटक दरीत कोसळला; त्यानंतर...

दरम्यान कराड शहरात शेकडो मोकाट कुत्री टोळ्याने फिरत असतात ती लहान मुलांच्यावर व महिलांवर तसेच वृद्धांवर रस्त्याने जाताना हल्ला करत असतात. वाहन चालकांचे मागे झुंडीने लागत असतात. त्यामुळे गंभीर अपघात झालेले आहेत व होऊ शकतात. त्यामुळे पुन्हा एकदा एखाद्या मनुष्याचा बळी जाण्याआधी संपूर्ण कराड शहरातील मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करावा व कराड शहर मोकाट कुत्र्यांपासून मुक्त करावे. तसे न झाल्यास आम्हांला आंदोलनाचा मार्ग स्वीकारावा लागेल असेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

Edited By : Siddharth Latkar

street dogs, karad, children feared
ही तर परिवर्तनाची नांदी ! एकनाथ शिंदेंसह बंडखाेर शिवसैनिकांनी केलं शंभूराज देसाईंचे अभिनंदन
street dogs, karad, children feared
21 गुन्हे दाखल असलेल्या केतकी चितळेची अटक टळली; असं नेमकं काय घडलं काेर्टात?

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com